जगातील ‘या’ देशांमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस

| Updated on: Dec 25, 2024 | 12:02 AM

ख्रिसमसचा सण जगभरात खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला तर मग तुम्हाला या देशांबद्दल ख्रिसमस साजरा कसा केला जातो.

जगातील या देशांमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस
Christmas
Follow us on

ख्रिसमस हा सण जगभरात विशेष उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिश्चनांसाठी हा सण खूप खास आहे. असे मानले जाते की येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता, त्यानंतर हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी लोकं चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवून प्रार्थना करतात. साधारणपणे ख्रिसमसच्या दिवशी लोकं ख्रिसमस ट्री सजवतात, प्रार्थना करतात आणि पार्टी करतात. पण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तो साजरा करण्याची पद्धतही वेगळी आहे. काही देशांमध्ये ख्रिसमस हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, तर अनेक ठिकाणी तो एकदम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग त्या देशांबद्दल जाणून घेऊयात जिथे ख्रिसमस एकदम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो

नॉर्वेमध्ये झाडू लपवून ठेवणे

नॉर्वेमध्ये ख्रिसमस एकदम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येथे लोकं त्यांच्या घरातील झाडू लपवतात. कारण ख्रिसमसच्या वेळी झाडू लपवून न ठेवल्यास दुष्ट आत्मा त्यांची चोरी करतात, असे मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून तेथील लोकं झाडू लपवून ठेवतात.

जपानमधील केएफसी फूड खाणे

जपानमध्ये ख्रिसमसच्या काळात बहुतेक लोक आपल्या कुटुंबासोबत खाण्याचा आनंद घेतात. इथले लोकं ख्रिसमसच्या वेळेस केएफसीमधून पदार्थ ऑर्डर करतात. कारण १९७० च्या दशकात केएफसीने जपानमध्ये ख्रिसमससाठी विशेष प्रचार मोहीम राबवली आणि तेव्हापासून जपानमध्ये ख्रिसमसदरम्यान ही एक परंपरा बनली आहे. २४ डिसेंबरला केएफसीला ऑर्डर देणे हा इथल्या परंपरेचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

जर्मनीमध्ये शूजमध्ये कँडी भरणे

ख्रिसमसच्या दिवशी सांता भेटवस्तू देण्यासाठी येत असतो, अशी जगभरातील प्रत्येक लहान मुलांची समाज आहे. त्यामुळे जर्मनीत २५ डिसेंबरच्या रात्री सर्व लहान मुलं त्याचे शूज घराबाहेर ठेवतात. तेव्हा कोणते मुलं वर्षभर चांगले वागले असेल तर त्यांच्या शूजमध्ये सांता येऊन कॅडी भरून जातो.अश्या पद्धतीने जर्मनीमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो.

पोर्तुगालमध्ये जेवणाच्या टेबलावर अतिरिक्त प्लेट ठेवल्या जातात. पोर्तुगालमध्येही ख्रिसमस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येथील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे पूर्वज मृत्यूनंतर ख्रिसमस साजरा करण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यामुळे पोर्तुगालमध्ये या दिवशी लोक डायनिंग टेबलवर त्यांच्या पूर्वजांसाठी जेवणाची एक्सट्रा प्लेट ठेवतात.