मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. बरेच लोक या थंड वातावरणात त्वचेला खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. परंतु, याकाळात त्वचेशी संबंधित ‘एक्झिमा’ या आजारामुळे देखील अनेक लोक त्रासलेल आहेत. ‘एक्झिमा’ हा एक त्वचारोग आहे. मात्र, या आजाराबद्दल लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या आजारात त्वचेवर लाल डाग उठतात आणि खाज येण्यास सुरुवात होते. जेव्हा आपण हे लाल डाग स्क्रॅच करण्यास सुरुवात करतात, तेव्हा तेथे सूज येते आणि त्या ठिकाणाहून पाणी येऊ लागते (Unknown Facts about Eczema diseases).
‘एक्झिमा’ आजाराची बरीच कारणे असू शकतात. आपल्याला याच्या बर्याच कारणांबद्दल माहिती नसते. हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अनेक लोकांच्या मनात ‘एक्झिमा’बद्दल अनेक प्रकारचे संभ्रम आहेत, ज्यावर त्यांना विश्वास आहे. हे संभ्रम वेळीच दूर होणे गरजेचे आहे. चला तर, ‘एक्झिमा’ आजार आणि त्या संबंधित गोष्टींबद्दल जाणून घेऊया…
लोकांना असे वाटते की, ‘एक्झिमा’ हा एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरतो. परंतु, हे सत्य नाही. एक्झिमा हा अनुवांशिक आजार आहे, परंतु तो स्पर्शाद्वारे एकमेकांमध्ये पसरत नाही. बऱ्याच लोकांना असे वाटते की ज्या व्यक्तीला एक्झिमा आहे, त्यांना नुसता स्पर्श केल्याने देखील पसरतात. जर तुमच्या घरात कुणाला एक्झिमा असेल, तर बाळाला देखील हा आजार होण्याचा धोका असतो. कारण त्यांची त्वचा खूप संवेदनशील असते. तथापि, त्याची लक्षणे सुरुवातीच्या वर्षात दिसू लागतात. आपण आपल्या बाळाला या आजारातून सुरक्षित ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापर करू शकता (Unknown Facts about Eczema diseases).
तणावामुळे एक्झिमा होतो हा एक गैरसमज आहे. एक्झिमा ताणामुळे होत नाही. परंतु, जास्त ताण आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो हे मात्र खरे आहे. वाढत्या ताणामुळे शरीरातील तणाव संप्रेरक वाढतात, ज्यामुळे सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.
एक्झिमा बरा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. सर्व प्रथम, आपल्याला यामागील कारणाबद्दल माहिती मिळवावी लागेल. वारंवार मॉइश्चरायझर आणि दाहक-विरोधी औषधे खाल्ल्याने सूज आणि लालसरपणा कमी होतो. मात्र लवकर बरे होण्याच्या नादात केलेल्या उपचारांमुळे सूज आणि खाज सुटण्याची समस्या आणखी वाढू शकते. म्हणून त्वचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या. तसेच जास्त व्यायाम करणे टाळा जेणेकरून आपल्याला जास्त घाम येणार नाही. थंडीच्या दिवसांत त्वचेला मॉइश्चराइज्ड ठेवा.
(Unknown Facts about Eczema diseases)
Blood Pressure | ब्लड प्रेशर कधी तपासावं, कोणती काळजी घ्यावी?https://t.co/zL61qJu3wL #BloodPressureBreak #BloodPressure
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020