जपानी लोक अत्यंत शिस्तप्रिय असतात. अत्यंत स्वच्छता पाळणारे असतात. कोणतंही काम वेळेत करण्यावर त्यांचा भर असतो. आळस हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नसतो. इतरांचा आदर करणं हे त्यांच्या रक्तातच असतं. नम्रता हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच जपानी लोक जगभरात आदर्श लोक म्हणून ओळखले जातात. जपानचं कल्चर आणि परंपरा सुद्धा जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या परंपरा, संस्कार आणि रुढीतून केवळ Crisis Management च नव्हे तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटीही सुधारण्यास मदत होते.
आज आपण जपानी कल्चरचा विचार करणार आहोत. तुम्ही जपानी कल्चरमधील या गोष्टी जर आत्मसात केल्या तर तुम्हाला तुमचं लाइफ व्यवस्थित मॅनेज करता येईल. जपानी लोकांच्या या कॉन्सेप्ट कोणत्या आहेत? ते काय करतात? याचीच माहिती आपण घेणार आहोत.
Ikigai
जपानी भाषेत Iki चा अर्थ लाइफ असा होतो आणि gai चा अर्थ व्हॅल्यू म्हणजेच मूल्य असा होतो. ढोबळमानाने ईकीगाई म्हणजे जीवनमूल्य असं तुम्ही म्हणू शकता. जपानी लोकांच्या मते याचा अर्थ, तुम्ही जी कोणती गोष्ट कराल ती अत्यंत चांगली करा आणि पॅशनेट होऊन करा. तुम्ही जी गोष्ट करत आहात, तिचा शोध घेण्याच्या पद्धतीसाठी जपानी लोक या शब्दाचा वापर करतात.
Shikita Ga Nai
या शब्दाचा अर्थ म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करा आणि आयुष्याला पुढे न्या. जीवनात अनेक प्रसंग येतात, अशी परिस्थिती येते की ती आपण बदलू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सामोरे गेलं पाहिजे, असं जपानी लोक म्हणतात.
Wabi Sabi
जीवनातील त्रुटींना स्वीकारा. केवळ आपल्याच नव्हे तर दुसऱ्यांच्या त्रुटीही अत्यंत सहज आणि सुंदरपणे शोधा, असा या प्राचीन जपानी तत्त्वज्ञानाचा अर्थ आहे.
Gaman
Gaman चा अर्थ कठिण प्रसंगात तुमचं धैर्य खचू देऊ नका. वाईट काळ आपल्याला सेल्फ कंट्रोल आणि इमोशनली मॅच्युअर्ड होण्यास शिकवतो. त्यामुळेच सहनशक्ती आणि धैर्य ठेवलं पाहिजे.
Oubaitori
कुणाशीही स्वत:ची तुलना करू नका, असा या जपानी म्हणीचा अर्थ आहे. सर्वांचे मार्ग वेगळे असतात. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यामुळे एखादा व्यक्ती वेगळ्या मार्गाने जात असेल तर आपण आपल्याला कमी समजू नये, आपल्यावरच आपण प्रश्न उपस्थित करू नये. तो ज्या मार्गाने चाललाय त्यामागे त्याचं ध्येय वेगळं असू शकतं. त्यामुळे तुम्ही त्या मार्गाने गेलंच पाहिजे असं नाही. कारण तुमच्या आणि त्याच्या ध्येयात फरक असणारच.