Homemade Hand Scrub: या होममेड स्क्रबच्या वापराने घालवा टॅनिंग, मिळवा मुलायम त्वचा

| Updated on: Jan 07, 2023 | 4:57 PM

आपल्या हातावर जमा झालेल्या टॅनमुळे हाताच्या सौंदर्याच बाधा येते. अशा वेळी त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी तुम्ही होममेड स्क्रबचा वापर करू शकता.

Homemade Hand Scrub: या होममेड स्क्रबच्या वापराने घालवा टॅनिंग, मिळवा मुलायम त्वचा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – बरेच वेळा त्वचेची काळजी (skin care) घेताना केवळ चेहऱ्याची जास्त काळजी घेतली जाते. मात्र हाता-पायांकडे बरेच वेळेस दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत अनेकवेळा हातावर जमा झालेल्या टॅनमुळे हात (tanning on hands) खराब दिसतो. अशा वेळी हातांवर साचलेले टॅन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रबचाही (homemade scrub) वापर करू शकतो. हे स्क्रब नैसर्गिक घटक वापरून बनवले जातात. ते तुमची त्वचा शुद्ध करण्याचे काम करतात. त्यामुळे आपली त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. हातांसाठी कोणते होममेड स्क्रब वापरावे, हे जाणून घेऊया.

साखर आणि नारळाचे तेल

तुम्ही तुमच्या त्वचेसाठी साखर आणि नारळाच्या तेलापासून बनलेला स्क्रब वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल. यासाठी एका भांड्यात एक चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात 1 चमचा साखर, मध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. हे सर्व नीट मिसळा. आता या स्क्रबने त्वचेला 1 ते 2 मिनिटे मसाज करा. यानंतर हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

हे सुद्धा वाचा

कॉफी स्क्रब

एक कप कॉफी केवळ आपल्याला ऊर्जावान ठेवण्याचे काम करत नाही तर त्याचा स्क्रब म्हणूनही वापर होऊ शकतो. यासाठी एका बाऊलमध्ये 3 चमचे कॉफी घ्या. त्यात थोडे खोबरेल तेल व थोडी साखर घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि हाताला लावून नीट स्क्रब करा. 2 ते 3 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हात धुवा.

व्हिटॅमिन ई ऑईल स्क्रब

तुम्ही व्हिटॅमिन ई ऑईलनेही स्क्रबल बनवू शकता. एका भांड्यात 2 चमचे ब्राऊन शुगर घ्या. त्यात व्हिटॅमिन ई ऑईलचे 5 ते 6 थेंब टाका. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. आता हे मिश्रण त्वचेवर लावून नीट स्क्रब करा. त्यानंतर हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. या स्क्रबमुळे त्वचेवर जमा झालेले टॅन दूर होण्यास मदत होईल. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येईल.

इसेंशिअल ऑईल स्क्रब

हे स्क्रब बनवणे खूप सोपे आणि प्रभावी आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यात अर्धी वाटी साखर घ्या. त्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यात लॅव्हेंडर तेलाचे 10 ते 12 थेंब घाला. आता या सर्व गोष्टी मिक्स करा. हे मिश्रण हातावर लावून काही वेळ स्क्रब करा. यानंतर साध्या पाण्याने हात धुवा.