मुंबई : प्रदूषण, चुकीची आहार पद्धती आणि कमी पाणी पिण्याची सवय हे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच तिच्या सौंदर्यावरही परिणाम करते. विशेषत: त्याचा परिणाम स्त्रियांमध्ये दिसून येतो. यामुळे, लहान वयातच सुरकुत्या आणि मुरुमे चेहऱ्यावर दिसू लागतात. तसेच चेहरा बराच कोमेजलेला दिसतो. तथापि, याची अनेक अनेक कारणे असू शकतात. यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (Use yogurt and linseed face pack to get rid of pimples)
मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा निखारण्यासाठी दही आणि अळशीचा फेसपॅक खूप प्रभावी आहे. दही चेहऱ्याला मॉइश्चराईझ करण्याचे काम करते, तर अळशीमध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा चमकते आणि निरोगी होते. पॅक बनविण्यासाठी, एक चमचा अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे वाटून दोन चमचे दह्यामध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे ते अर्धा तास ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.
मलाई आणि लिंबाच्या वापरामुळे चेहऱ्यावर निखार आणण्यासोबतच मुरुमांची समस्याही दूर होते तसेच चेहर्याचा रंगही साफ होतो. यासाठी ताज्या मलईमध्ये लिंबाचे काही थेंब घाला आणि ते सुमारे अर्धा तास चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. आपण हे दररोज लावू शकता.
मुरुमांचा त्रास दूर करण्यासाठी कापूर देखील प्रभावी आहे. यासाठी एक चमचाभर पाणी घ्या आणि त्यात एक चिमूटभर कापूर पावडर मिसळा. त्यानंतर, एक चमचा मुल्तानी माती आणि काही थेंब मध घाला आणि ही पेस्ट चेहर्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
जर चेहर्यावर डाग असतील तर एक चमचा दहीमध्ये चिमूटभर हळद घाला आणि चेहऱ्यायावर हलक्या हातांनी मालिश करा. त्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या. साधारण 15 मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
या सर्व उपायांव्यतिरिक्त, त्वचेला चमकदार आणि ग्लोईंग बनविण्यासाठी आहाराची भूमिका महत्वाची आहे. आपल्या आहारात अधिक फळे आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करा. कडधान्ये आणि कोशिंबीर खा. रस, ताक, दही आणि खोबरे पाणी इत्यादी खा. तसेच भरपूर पाणी प्या. (Use yogurt and linseed face pack to get rid of pimples)
काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेहhttps://t.co/b83kTChoIO#ANdhraPradesh |#Son |#took |#mothersDeadbody |#throughBike
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
इतर बातम्या
लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार का?, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी चर्चा काय?