केवळ भारताचा ‘केंद्रबिंदू’च नव्हे, तर ‘संत्र्याचे शहर’ नागपूर ‘या’ ठिकाणांसाठीही प्रसिद्ध!

| Updated on: Dec 22, 2020 | 11:33 AM

महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहर हे 'ऑरेंज सिटी' अर्थात ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्यानंतर नागपूर, हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे.

केवळ भारताचा ‘केंद्रबिंदू’च नव्हे, तर ‘संत्र्याचे शहर’ नागपूर ‘या’ ठिकाणांसाठीही प्रसिद्ध!
शून्य मैलाचा दगड
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहर हे ‘ऑरेंज सिटी’ अर्थात ‘संत्र्यांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्यानंतर नागपूर, हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूरला भारताची ‘टायगर राजधानी’ असे देखील म्हटले जाते. गोंड राजघराण्याने नागपूरची स्थापना केली आणि नंतर त्यावर मराठा साम्राज्यातील राजांनी राज्य केले होते. नंतर ब्रिटिशांनी नागपूरला ताब्यात घेऊन प्रांताची राजधानी म्हणून घोषित केले (Vacation trip destination near Nagpur).

नागपूर शहराच्या नावातील ‘नाग’ हा मनोरंजक शब्द, नाग नदीच्या नावावरून प्रचालित आहे व ‘पूर’ हा शब्द संस्कृत आणि हिंदी शहरांशी जोडण्यासाठीचा प्रत्यय आहे. नागपूर शहराच्या पोस्टल स्टॅम्पवर आजही सापाची प्रतिमा आहे. हे शहर समुद्र सपाटीपासून 310 मीटर उंचीवर स्थित आहे. हिरव्या गार वातावरणामुळे भारतात चंदीगडानंतर, नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे.

 

तोतलाडोह

नागपूर जिल्हयात नागपूर रेल्वे स्थानकापासून 80किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले ‘तोतलाडोह’ नावाचे धरण प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-7जवळ हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक असून, या निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात.

कसे पोहोचाल? : नागपूर रेल्वे स्थानकापासून स्थानिक वाहनव्यवस्था

 

खिंडसी तलाव

रामटेक तालुक्यात असलेल्या ‘खिंडसी’ तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे भेट देणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे खास थीम पार्कही आहे. तर साहसी उपक्रमांची आवड असणाऱ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

कसे पोहोचाल? : नागपूर रेल्वे स्थानकापासून स्थानिक वाहनव्यवस्था (Vacation trip destination near Nagpur)

 

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले ‘सातपुडा बॉटनिकल गार्डन’ हे अतिशय अदभुत गार्डन असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात अनेक पक्षीदेखील विहार करतात.

कसे पोहोचाल? : नागपूर रेल्वे स्थानकापासून रिक्षा किंवा बस

 

शून्य मैलाचा दगड :

नागपूर शहरामधील शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागात असल्यामुळे, हे स्थान निर्मिण्यात आले आहे. या दगडाच्या खालच्या षटकोनी पायावर चिन्हांकित केल्याप्रमाणे इतर शहरे नागपुरातील झिरो माईलपासूनचे अंतर दर्शवतात.

कसे पोहोचाल? : नागपूर रेल्वे स्थानकापासून रिक्षा किंवा बस

(Vacation trip destination near Nagpur)

हेही वाचा :