मुंबईः व्हॅलेंटाइन वीकचं (Valentine week) तरुणाईनं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. यंदाच्या व्हॅलेंटाइन वीकमध्ये तुम्हाला काही संस्मरणीय आठवणी तयार करायच्या असतील तर रेल्वे विभागातर्फे खास ऑफर (Offer) देण्यात आली आहे. IRCTC ने यंदा एक चांगलं पॅकेज (Tour Package) जाहीर केलंय. आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाइन डेला समुद्र किनाऱ्यावर निवांत वेळ घालवाला, असं वाटत असेल तर तुम्ही रेल्वेच्या या पॅकेजद्वारे तुमची इच्छा पूर्ण करू शकता.
आता बीचवर जायचं म्हटलं तर आधी डोळ्यासमोर येतो गोव्याचा सुखद समुद्र किनारा. आजूबाजूला प्रेमाचं वारं वाहत असताना गोव्याला सोप्या प्रवासानं जाण्याची संधी मिळाली तर कुणालाही हवी-हवीशी वाटणार. रेल्वेचा प्रवास म्हटला की खर्चही कमी येतो. त्यामुळेच कपल्सच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी IRCTC ने उत्तम ऑफर दिली आहे.
गोव्यातील प्राचीन चर्चची सफर, समुद्र किनारी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जोडीदारासोबत निवांत क्षण घालवणं, किंवा रेस्टॉरंटमधून उगवता-मावळत्या सूर्याचं बिंब न्याहाळत बसाव बसावं… यासाठी अनेक जागा आहेत. विशेषतः तरुणाई आणि प्रेमी जोडप्यांसाठी इथली ठिकाणं प्रसिद्ध आहेत.आता IRCTC नं दिलेल्या खास ऑफरविषयी वाचुयात..
यंदाचा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी IRCTC ने 5 दिवस आणि 4रात्रीचं पॅकेज दिलंय. तुम्हाला वाटेल आता व्हॅलेंटाइन डेसाठी काही दिवसच शिल्लक आहेत, काय करणार… तर तसं नाहीये. IRCTC ची ही ऑफर मार्च महिन्यापर्यंत देण्यात आली आहे.
म्हणजेच तुम्हाला व्हॅलेंटाइन डे च्या गर्दीत जायचं नसेल, जरा निवांत ट्रिप काढायची असेल तर व्हॅलेंटाइन डे झाल्यानंतरही तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता. IRCTC च्या ऑफिशिअल वेबसाइटवर जाऊन याची बुकिंग करता येईल.
ट्रिपला तुम्ही एकट्याने जाणार असाल तर तुम्हाला ५१ हजार रुपये शुल्क लागेल. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी कुणी एकट्याने तर जाणार नाही. तर दोघे गेल्यास ४० हजार ५०० रुपये प्रति व्यक्ती असं शुल्क असेल. तर तिघे जण गेलात तर ३८ हजार १५० रुपये प्रति व्यक्ती असा खर्च येईल.
गोव्यातील या टूर पॅकेजची सुरुवात व्हॅलेंटाइन वीकपासून होतेय. ११ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत तुम्हाला कधीही बुकिंग करता येईल.
या पॅकेजमध्ये नॉर्थ आमि साऊथ गोवा अशा दोन्ही ठिकाणी फिरण्याची संधी असेल. भुवनेश्वर, चंदीगड आणि इंदौर, पटन्यातून तुम्हाला गोव्यात नेलं जाईल. या पॅकेजमध्ये पाच ब्रेकफास्ट आणि पाच डिनरचा समावेश आहे.