मुंबई : मार्च संपण्याआधीच गरमीचा तडाखा वाढला आहे. पार्याने आतापासूनच अधूनमधून विक्रमी उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. भर उन्हात चालताना आपली चांगलीच दमछाक होत आहे. सतत घाम येत असल्यामुळे आपणाला थकवा जाणवतो. यातूनच डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे अशा विविध व्याधींना निमंत्रण मिळते. उन्हाळ्यातील या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. उकाड्यापासून वाचायचे असेल तर आपल्या आहारातही काही बदल करणे गरजेचे आहे. (want to avoid trouble of hit, then make these change in your diet)
1. सकाळची सुरुवात पाण्याने करा. कमीत कमी दोन ग्लास पाणी प्या. सकाळी तोंडात अशी काही द्रव्ये असतात, ज्यामुळे पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. तोंड न धुताच पाणी प्यायल्यामुळे आरोग्यदायी स्वरुपाची द्रव्ये आपल्या शरीरात पोहोचतात.
2. शक्य असल्यास पाण्यासोबत अर्धा चमचा ओवा खा. उन्हाळ्यात गॅस आणि आंबटपणाचा त्रास होतोच. उन्हाळ्यातील या सामान्य समस्या आहेत. ओवा खाल्ल्यामुळे अशा त्रासांपासून आराम मिळतो. पाण्याबरोबर ओवा खाल्ल्यानंतर सुमारे एक तास काहीही खाऊ नका.
3. जर आपल्याला चहाची सवय असेल तर त्याऐवजी ग्रीन टी पिण्यास सुरूवात करा. चहामुळे गॅस आणि आंबटपणाची समस्या वाढते. आपण सकाळी एक ग्लास सरबत घेतल्यास आरोग्यासाठी चांगले असेल. आपण मोसंबी, संत्रा, डाळिंब, टरबूज इत्यादींचा ज्यूस पिऊ शकता.
4. नाश्त्यात स्प्राउट्स, ओट्स, पोहा, उपमा आणि रोस्टेड ब्रेड खा.
5. घरातून बाहेर पडताना आपल्याबरोबर बाटलीमध्ये शिकंजी घेऊन जा. शिकंजी तुमचे पोट आणि मेंदू थंड ठेवण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त शरीरात तत्काळ उर्जा देण्याचे कार्य करेल. शिकंजी शरीरातील पाण्याची उणिव भरून काढते. परंतु उन्हातून आल्यानंतर लगेच हे पिऊ नका. थोडा वेळ थांबा आणि मग प्या.
6. जेवणात डाळ, तांदूळ, चपाती, भाजी, ताक आणि कोशिंबीर घ्या. कोशिंबीरीमध्ये काकडी, कांदा, मुळा टोमॅटो इत्यादी खा. यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होईल. तसेच शौचाचा त्रास थांबेल.
7. तुमच्या बॅगमध्ये भाजलेले चणे आणि बिस्किट वगैरे ठेवा. जेवल्यानंतर दोन तासांनी आपण हे भाजलेले चणे आणि बिस्किट स्नॅक म्हणून खाऊ शकता.
8. रात्रीचे हलके जेवण घ्या. भाजीमध्ये दूधी, भेंडी, लुफा इत्यादी पाणीदार पालेभाज्या खा. चपाती कमी खा, पण भाज्या पुरेशा प्रमाणात खा. बाहेरचे खाणे टाळा. जेवल्यानंतर एक तासाने एक कप दूध नक्की प्या. (want to avoid trouble of hit, then make these change in your diet)
गुगलचे उपाध्यक्ष सीझर सेनगुप्तांचा 15 वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा#Caesarsengupta #google #googlechrome #GooglePay #googleVPhttps://t.co/sR9Zh94bh4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या
SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोड
Kabaddi in Telangana: तेलंगणाच्या सूर्यापेटमधील कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 50 हून अधिक जखमी