मुंबई : हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टाइलिश दिसणं अवघड असतं. अशा परिस्थितीत ड्रेससोबत स्वेटर कॅरी करावं की जॅकेट असा गोंधळ उडतो. कोणत्या कपड्यांसोबत कोणते शूज घालायचे? असा प्रश्नसुद्धा नेहमीच पडतो. कधीकधी, महागडे कपडे घालूनही तुम्ही काही कॉमन चुका करता ज्यामुळे तुम्हाला हवा असलेला लूक मिळत नाही.
हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही या चुका टाळल्या पाहिजे.
रंगीबेरंगी लेअरिंग
हिवाळ्यात, तुम्ही स्वतःला स्टाईलिश आणि फिट दर्शविण्यासाठी अनेकदा कपड्यांची लेअर करत परिधान करतो. मात्र लेअरिंग करताना वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालण्याऐवजी सारख्या रंगाचे कपडे घाला. हिवाळ्यात, कलरफुल कपडे परिधान करण्याएवजी न्यूट्रल रंगाचे कपडे वापरा. तुम्ही तुमच्या ड्रेससह स्कार्फ, ग्लोव्हज, कॅप्ससारखे अॅक्सेसरीजसुद्धा कॅरी करू शकता.
अँकल पूर्ण झाकून घ्या
हिवाळ्यात, बरेच लोक अँकलला खुलं ठेवतात. बऱ्याच लोकांना पारंपारिक पोशाखात पाय झाकणं आवडत नाही. तर काही लोक अँकल लेन्थ लांबीचे जीन्स आणि क्रॉप टॉप परिधान करतात. आपलं अँकल जास्त दिसत नाही ना हे नेहमी लक्षात घ्या. जास्त अँकल दिसत असेल तर तुम्ही त्यासह स्किन कलरचे मोजे वापरू शकता.
एथनिक ड्रेससह कॅज्युअल जॅकेट्स
बहुतेक लोक एथनिक ड्रेससह कॅज्युअल जॅकेट घालतात जे अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्ही अशा ड्रेसवर एथनिक जॅकेट किंवा कोट घातला पाहिजे. त्यासाठी तुमच्या कपाटात नेहमी एक-दोन एथनिक विंटर जॅकेट ठेवा.
सैल स्वेटर आणि जॅकेट परिधान करणं टाळा
लोकांना असं वाटतं की हिवाळ्यात सैल स्वेटर आणि जॅकेट चांगले दिसतात. मात्र विश्वास ठेवा, यात तुमच्या शरीराचा आकार चांगला दिसत नाही. सैल जॅकेटमध्ये तुमचं शरीर जड दिसू शकतं. नेहमी फिट जॅकेट्स आणि स्वेटर परिधान करा.
संबंधित बातम्या
Fitness | अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी जिमची गरज नाही! घरच्या घरी करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार…
Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करून हाताची बोटं दुखतायत? मग, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा!