मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरातच नव्हे तर, जगभरात हाहाकार मजला आहे. या परिस्थितीतून आपण सामान्य स्थितीत परतण्याची धडपड करत असतानाच ‘एव्हियन फ्लू’ अर्थात ‘बर्ड फ्लू’ या आजाराने पुन्हा डोकेवर काढले आहे. भारतातील निरनिराळ्या राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे काही राज्यात प्रशासनाने संक्रमित बदके, कोंबड्या आणि इतर पाळीव पक्षांना पकडण्यास सुरुवात केली आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशभरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना आपणही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. या रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने ‘या’ गोष्टींचे कटाक्षाने पालन केले पाहिजे (We must avoid this things to stay safe from bird flu).
या व्यतिरिक्त, आपण हातात ग्लोव्हज् न घालता मृत पक्ष्यांना स्पर्श करणे देखील टाळले पाहिजे. तसेच, आपण आपले हात वारंवार धुतले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे, आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरण्याची सवय लावा. केवळ 100 डिग्री सेल्सिअस तापमानावरच शिजवलेले मांस आणि इतर मांसाहारी पदार्थच खा. आजारी किंवा सुस्तावलेल्या कोंबडीपासून थेट संपर्क टाळा (We must avoid this things to stay safe from bird flu).
H5N1 या विषाणूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.
या आजाराचे बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना 1997मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता.
H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस 165ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.
(We must avoid this things to stay safe from bird flu)
PHOTO | ‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका, संक्रमित पक्षांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी तैनात!#BirdFlu | #birdfluvirus | #H5N1 https://t.co/mKVNCkF83D
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021