लाईफस्टाईल : आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे, लग्न म्हटलं की मेकअप आलाच. लग्नात प्रत्येक वधूचा मेकअप सर्वांचं लक्ष वेधून घेतो. मेकअप केल्यानंतर वधूचा संपूर्ण लूक बदलून जातो आणि वधू खूप सुंदर दिसते. पण जर चुकून मेकअप बिघडला तर वधूचा लूक डल दिसतो. त्यामुळे लग्नात योग्य मेकअप निवडणं खूप गरजेचं असतं. तर सध्या ट्रेंडमध्ये आहे तो एचडी मेकअप. एचडी मेकअपमुळे वधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं.
एचडी मेकअपध्ये वधूच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स या गोष्टी तपासून तो मेकअप केला जातो. तसंच एचडी मेकअप केल्यानंतर चेहर्यावरील डागही दिसत नाहीत. तसंच हा मेकअप एचडी कॅमेरा लक्षात ठेवून केला जातो. तर आता आपण एचडी मेकअप म्हणजे काय आणि तो कसा केला जातो याबाबत जाणून घेणार आहोत.
एचडी मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन मेकअप लूक. आजकाल प्रत्येक लग्नसमारंभात एचडी कॅमेऱ्याद्वारे फोटोशूट केले जाते. तर एचडी कॅमेऱ्यामुळे एचडी मेकअप केला जातो जेणेकरून वधूच्या चेहर्यावर दिसणारे फ्लॉन्स कॅमेऱ्यात दिसत नाहीत ते मेकअपमुळे लपलेले असतात. त्यामुळे आजकाल सेलिब्रिटीज देखील एचडी मेकअप मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. एचडी मेकअप हा नॅचरल, नॉन-क्रिकी असा लुक देतो. तर हा मेकअप नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो.
एचडी मेकअप करताना तुमच्या चेहऱ्याला सूट होतील अशी प्रोडक्ट्स निवडावी लागतात. मग एचडी मेकअपसाठी लागणारी प्रोडक्ट्स ही लाईट डिफ्यूझिंग कोटिंग आणि हाय-एंड लेपित असतात. या मेकअपमध्ये प्रीमियम दर्जाची प्रोडक्ट्स वापरली जातात. ही प्रोडक्ट्स तुमच्या चेहर्यावरील डाग लपवतात. तसंच मेकअप चेहऱ्यावर लावल्यानंतर तो अजिबात हेवी वाटत नाही. हा मेकअप सामान्य मेकअपप्रमाणेच केला जातो. ब्रश आणि स्पंजने हा मेकअप नीट ब्लैंड केला जातो. तसंच एचडी मेकअप केल्यानंतर चेहर्यावर एक नॅचरल ग्लो आल्यासारखं वाटतं.