Health Alert | तुमची नखं सांगतात आरोग्याबद्दल बरंच काही, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

| Updated on: Jan 27, 2021 | 3:57 PM

आपली नखे ​​आपल्या आरोग्याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात, हे बहुतेक लोकांना माहितच नसते.

Health Alert | तुमची नखं सांगतात आरोग्याबद्दल बरंच काही, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
बोटांच्या नखांमध्ये लपलंय रहस्य; रंग आणि आकार पाहून कळतो व्यक्तीचा स्वभाव
Follow us on

मुंबई : आपली नखे ​​आपल्या आरोग्याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात, हे बहुतेक लोकांना माहितच नसते. पांढर्‍या रंगाची नखे, हलक्या गुलाबी रंगाची नखे, अर्धवट तुटलेली नखे आपल्या शरीरातील अनेक रोगांची सुरुवात होत असल्याचे सांगत असतात. यात यकृत, फुफ्फुस आणि हृदय यासारख्या आजारांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊया अशी कुठली लक्षणे आहेत, ज्यावरून तुम्ही आधीच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकाल…(What your nails says about your health)

फिकट गुलाबी नखे

खूप फिकट गुलाबी नखे कधीकधी गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. जसे की, अशक्तपणा, कंजेस्टिव हार्ट फेल्युअर, यकृताच्या समस्या, कुपोषण या आजारांमुले नखे फिकट गुलाबी दिसू शकतात.

पांढरी नखे

जर आपले नखे पूर्णपणे पांढऱ्या रंगाची असतील तर, ते यकृता संबधी समस्या दर्शवतात. हिपॅटायटीस या आजारात आपल्या हाताची बोटं देखील पिवळी पडतात. हेसुद्धा यकृत समस्येचेच आणखी एक लक्षण आहे.

पिवळी नखे

नखे पिवळी ​​होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे फंगल इंफेक्शन. जर हे संक्रमण जास्त वाढले तर नखे पूर्णपणे देखील काढून टाकवी लागतात. अशावेळी नखे तुटू लागतात आणि त्याचा चुरा देखील होऊ शकतो. नखे पिवळसर होणे क्वचित प्रसंगी एखाद्या गंभीर समस्याचे लक्षण असू शकते. जसे की थायरॉईड, फुफ्फुसांचा रोग, मधुमेह आणि सोरायसिस इत्यादी.

निळसर नखे

निळ्या रंगाच्या नखांचा अर्थ असा आहे की, आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. हे फुफ्फुसांच्या समस्येचे संकेत देते. अशावेळी हृदयाची समस्या देखील असू शकते (What your nails says about your health).

मधोमध चीर पडलेली नखे

जर आपल्या नखांना मधोमध चीरा पडल्या असतील, तर हे सोरायसिस किंवा इतर गंभीर रोगांचे लक्षण असू शकते.

तुटलेली नखे

आपले नखे कधी कधी आपोआप तुटू लागतात. हे लक्षण थायरॉईड समस्येशी संबंधित असू शकते. त्याच वेळी, कुरतडलेल्या आणि तुटलेल्या नखांवर पिवळसरपणा असेल तर हे फंगल इन्फेक्शनचे लक्षण आहे.

फुगलेली नखे

जर आपली नखे फुगलेली आहेत किंवा लाल दिसतात, याचा अर्थ सूज देखील येऊ शकते. ज्यामुळे ल्युपस सारखी समस्या उद्भवू शकते.

नखांवर गडद रेषा

आपल्या नखांवर गडद रेषा दिसत असल्यास आपण लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. हे कधीकधी मेलेनोमामुळे उद्भवते, हा एक त्वचेचा धोकादायक कर्करोग आहे.

(What your nails says about your health)

(टीप : सदर माहिती संशोधनावर आधारित असून, कोणत्याही निदानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :