तळहात आणि तळपायावर केस का नसतात ? कधी विचार केला आहे का ?

| Updated on: Jun 24, 2023 | 3:33 PM

मानवी शरीरात एक खास प्रकारचे प्रोटीन असते, त्याला Wnt असे म्हटले जाते. या प्रोटीनतर्फे सिग्नल अथवा सूचना मिळाल्यावर शरीराच्या एखाद्या भागावर केसांची वाढ होणे सुरू होते.

तळहात आणि तळपायावर केस का नसतात ? कधी विचार केला आहे का ?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आपल्या शरीराशी निगडीत अशा अनेक रंजक बाबी (interesting facts about human body) आहेत, ज्याची आपल्याला कल्पनाही नसते, किंवा आपण त्याबद्दल अनभिज्ज्ञ असतो. तसेच आपल्या शरीराशी संबंधित असे अनेक प्रश्नही आहेत, ज्याची उत्तरं वैज्ञानिक गेल्या कित्येक वर्षांपासून शोधत आहेत. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोणत्याही माणसाचा तळहात आणि तळपाय (no hair on plams and feet sole)यावर केस का नसतात ? तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का ?

तुम्ही आत्तापर्यंत असे अनेक प्राणी पाहिले असतील ज्यांच्या हाताचा तळव्यावर तर काही प्राण्यांच्या तळपायावरही भरपूर केस असतात. पण, माणसांसदर्भात असं होत नाही. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणत्याही मनुष्याच्या हाता-पायाच्या तळव्यांवर केस नसतात. मात्र असे का होते, त्यामागचे कारण तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.

त्याचं उत्तर जाणून घेऊया…

सायन्स अलर्ट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, माणसाच्या हाता-पायाच्या तळव्यांवर केस का नसतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक बऱ्याच काळापासून संशोधन करत आहेत. बऱ्याच अभ्यासानंतर काही वर्षांपूर्वी (2018मध्ये) त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

काय आहे खरं कारण ?

याप्रकरणी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथील त्वचा विशेषज्ज्ञ सारा मिलर यांनी एक मुलाखत दिली होती. त्यांच्या सांगण्यानुसार, ‘ मानवी शरीरात एक खास प्रकारचे प्रोटीन असते, त्याला Wnt असे म्हटले जाते. हे प्रोटीन शरीरात एखाद्या मेसेंजरप्रमाणे काम करते आणि सेल्समध्ये केस उगवणे, स्पेस आणि त्यांची वाढ याबाबतची माहिती घेण्याचे कार्य करते. या प्रोटीनतर्फे सिग्नल अथवा सूचना मिळाल्यावर शरीराच्या एखाद्या भागावर केसांची वाढ होणे सुरू होते. ‘

सारा मिलर यांच्या सांगण्यानुसार, ‘ हाताचे तळवे किंवा तळपाय, यासारख्या शरीराच्या ज्या भागांवर केस नसतात, त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या काही नैसर्गिक अवरोधक असतात, जे या प्रोटीनला त्यांचे काम करण्यापासून रोखतात. हे अवरोधकही एखाद्या प्रोटीनप्रमाणेच असतात, त्यांना Dickkopf 2 (DKK2) असे म्हटले जाते. ‘

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘ वैज्ञानिकांच्या एका पथकाने यांसदर्भात उंदरांवर संशोधन केले. या रिसर्चदरम्या उंदरांमधून DKK2 हे प्रोटीन हटवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरावर आधी जिथे केस नव्हते, तिथेही केस उगवल्याचे दिसून आले. त्यानंतर काही सशांवरही हे संशोधन करण्यात आले. सशांमध्ये DKK2 प्रोटीन हे आधीपासूनच कमी असते, त्याच कारणामुळे त्यांच्या हाता-पायांवर जास्त केस उगवतात’ असेही दिसून आल्याचे समजते.