Relationship tips : बायकोच्या ‘या’ सवयी पतीला बिलकूल आवडत नाही, हसत्याखेळत्या संसारात कालवलं जाईल विष…

| Updated on: Jul 15, 2024 | 12:46 PM

Relationship Tips : लग्नानंतर नातं नीट ठेवणं, ते मेंटेन करणं ही जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही असते. पण एकानेही काही चूक केली तर त्याच परिणाम नात्यावरही होऊ शकतो. संसारात कोणत्या चुका टाळाव्यात ?

Relationship tips  : बायकोच्या या सवयी पतीला बिलकूल आवडत नाही,  हसत्याखेळत्या संसारात कालवलं जाईल विष...
बायकोच्या 'या' सवयी पतीला बिलकूल आवडत नाहीत
Image Credit source: freepik
Follow us on

लग्न ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होते, आणि आधीसारखी परिस्थिती उरत नाही. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये छोटं-मोठं भांडण होणे हे सर्रास घडते, त्यात चूक कोणाचीही असू शकते, पण प्रत्येक वेळी नवऱ्याचीच चूक असेल असे नाही, तर कधी-कधी पत्नीही अशा गोष्टी करते ज्यामुळे नाते बिघडू शकते. पुरूषांना पत्नीमधील काही गोष्टी आवडत नाहीत. स्त्रीने आपल्या पतीशी पत्नी म्हणून कसे वागू नये ते पाहूया.

पत्नीने या सवयी बदलाव्यात

1 प्रत्येक गोष्टीत संशय घेणे

विश्वास हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो. पती-पत्नीच्या नात्यात तो आणखी महत्त्वाचा ठरतो कारण हे नातं आयुष्यभर जपावं लागतं. अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा पत्नीला आपल्या पतीवर संशय येऊ शकतो. उदा- पतीने एखाद्या महिला मैत्रिणीशी किंवा सहकाऱ्याशी अनौपचारिकपणे बोलत असेल किंवा विनोद करत असेल. मात्र त्यामुळे त्याच्यावर संशय घेऊन अनेक स्त्रिया आपल्या पतीचा फोन तपासतात किंवा त्याचा पाठलाग करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. जर तुमच्या पतीचे अफेअर नसेल आणि तरीही तुम्हाला संशय येत असेल तर कुठेतरी तुम्ही तुमच्या पतीच्या विश्वासाचा अपमान करत आहात. संशय घेण्याची ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे.

2. मर्यादेपेक्षा अधिक मागण्या / हट्ट करणे

लग्नानंतर पत्नी आपल्या पतीला राजाप्रमाणे वागणूक देते, त्याची काळजी घेते, कामं करते. हे पूर्णपणे चुकीचे नाही. परंतु जर पत्नीने त्याच्याकडून सतत मागण्या केल्या, हट्ट पुरवायला सांगितले, तर ते नातं बिघडू शकतं आणि जोडप्यांमध्ये स्वाभाविक तणाव वाढू शकतो. तुमच्या पतीची आर्थिक मर्यादा काय आहे आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांसाठी तो किती बचत करत आहे हे तुम्ही पाहिले पाहिजे, त्याची नोंद ठेवावी. आणि त्याप्रमाणेच ते खर्च करू शकतील. म्हणूनच अती मागण्या करू नयेत.

3. पतीची इतरांशी तुलना

अनेक नात्यांत असे दिसून येते की काही बायका आपल्या पतीची तुलना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी किंवा बाहेरील व्यक्तीशी करतात. मात्र कोणत्याही नवऱ्याला, पत्नीची ही सवय कधी किंवा इतर कोणाशी तुलना केलेली कधीट आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पत्नीच्या या कृतीमुळे, इतरांशी तुलना केल्यामुळे स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला आपली तुलान दुसऱ्याशी केलेली आवडत नाही.
त्यामुळे पत्नीने हे लक्षात ठेवावे की प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने वेगळं जगत असते, समोरची व्यक्ती कितीही चांगली असली तरी ती तुमच्या पतीची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे विनाकारण तुलना करणे टाळा.