हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. ज्यांना रात्रभर मोबाईल वापरण्याची सवय आहे. ते वाय फाय सुरू ठेवूनच झोपतात. काही लोक तर रात्रभर फोन पाहत नाहीत. झोपलेले असतात. पण वायफाय सुरू ठेवूनच मोबाईल डोक्याजवळ घेऊन झोपतात. असं करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे शरीरावर प्रचंड परिणाम होतो. इंटरनेट सिग्नल शरीरासाठी घातक असतं. त्याचा काय परिणाम होतो याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.
‘नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ’ (NIH) च्या अभ्यासानुसार, Wi-Fi राउटरपासून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे मानवी मस्तिष्कासाठी हानिकारक असू शकतात. या किरणांचा सतत संपर्क होत राहिला, तर ते शरीरावर विविध प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात. याबाबतचं एक संशोधन झालं आहे. अनेक लोकांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. जे Wi-Fi सुरू ठेवून फोन डोक्याजवळ ठेवून झोपतात, त्यांना अनिद्रा, डोकेदुखी किंवा मायग्रेन, तसेच रक्तदाबामध्ये बदल यांसारख्या समस्या निर्माण होतात.
आतापर्यंत नॉन-आयोनायझिंग विकिरणाचे गंभीर परिणाम फारसे सांगितले गेले नाहीत, पण सध्या शास्त्रज्ञ या विकिरणांमुळे मस्तिष्काच्या पेशीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत आहेत. 2011 मध्ये यावर एक अभ्यास केला गेला होता. त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरणामुळे झोपेची समस्या होऊ शकते, असा दावा करण्यता आला होता. मोबाईलवर रात्री सतत राहणे, किंवा फोन डोक्याजवळ ठेवून झोपणे यामुळे अनेक लोकांना झोपेची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनिद्रा (इन्सोम्निया) देखील होऊ शकते.