रोड रोमियोंपासून बचाव करायचाय? महिलांनो, बाहेर पडताना ‘या’ 5 गोष्टी सोबत ठेवाच, वाढेल कॉन्फिडन्स, भीती होईल हद्दपार

| Updated on: Feb 03, 2023 | 10:41 AM

कामानिमित्त महिलांना घराबाहेर पडावं लागतं, काही वेळेस रात्री घरी परत यायलाही उशीर होऊ शकतो. अशा वळी अनेक महिलांना सुरक्षेबाबत भीती वाटू शकते. पण घरातून बाहेर पडताना स्व-संरक्षणांसाठी काही सेफ्टी टूल्स सोबत ठेवल्यास तुम्ही सेफ तर रहालच पण मनातील भीतीही निघून जाईल.

रोड रोमियोंपासून बचाव करायचाय? महिलांनो, बाहेर पडताना या 5 गोष्टी सोबत ठेवाच, वाढेल कॉन्फिडन्स, भीती होईल हद्दपार
Follow us on

नवी दिल्ली – आजकाल कामानिमित्त बहुतांश महिला घराबाहेर पडतात, काही जणी तर शिफ्ट ड्युटीमध्येही काम करतात. त्यामुळे पहाटे लौकर घराबाहेर पडावं लागतं किंवा रात्री घरी यायला उशीरही होऊ शकतो. अशा वेळेस बाहेर असताना महिलांना त्यांच्या सुरक्षेबद्दल (safety)थोडी भीती वाटू शकते. पण खरंतर महिला या स्वत:चे संरक्षण (Safety tips) स्वत:च करू शकतात. तुम्हालाही घराबाहेर पडताना टेन्शन येत असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जवळ ठेऊन तुम्ही तुमच्या भीतीवर क्षणार्धात मात करू शकता. घरातून बाहेर पडताना स्व-संरक्षणांसाठी नेहमीच काही सेफ्टी टूल्स (safety tools) सोबत ठेवावीत.

सेफ्टी टॉर्च

घरातून एकटं बाहेर पडताना महिला त्यांच्या पर्समध्ये शॉक इफेक्टवाली सेफ्टी टॉर्च ठेवू शकतात. या सेफ्टी टॉर्च महिलांना एकट्या बाहेर असताना खूप उपयोगी पडू शकतात. या टॉर्चच्या मदतीने महिला स्वतःचे संरक्षण करू शकतात.

हे सुद्धा वाचा

पेपर स्प्रे

पेपर स्प्रे एक छोटीशी बाटली महिलांना कोणत्याही छोट्या-मोठ्या त्रासापासून वाचवू शकते. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना बॅगमध्ये पेपर स्प्रे घेऊन जाऊ शकता. किंवा धाग्यांच्या मदतीने तुम्ही ते ब्रेसलेटमध्ये देखील बांधू शकता.

पेपर जेल

पेपर जेल देखील महिलांसाठी सर्वोत्तम सुरक्षितता साधन ठरू शकते. हे जेल तुम्ही दूरूनही शत्रूवर वापरू शकता. त्यामुळे बाहेर जाताना तुमच्या बॅगेत पेपर जेल घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

स्विस नाईफ

महिला स्विस नाईफचा वापर करून स्वतःचे संरक्षण करू शकतात. तुमच्याकडे स्विस नाईफ नसेल तर तुम्ही साधा छोटा चाकू, सुरी किंवा नेलकटरही बॅग अथवा पर्समध्ये ठेऊ शकता. तुम्हाला कोणीही त्रास दिला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी व स्व-संरक्षणासाठी तो उत्तम ठरतो.

फोल्डेबल रॉड

घराबाहेर पडताना महिला त्यांच्या पर्समध्ये फोल्डेबल सेफ्टी रॉड देखील ठेवू शकतात. हे रॉड अतिशय हलके आणि पोर्टेबल असतात, तसेच ते बॅगमध्ये जास्त जागाही व्यापत नाहीत. अशा परिस्थितीत महिला फोल्डेबल सेफ्टी रॉडच्या मदतीने स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)