मुंबई : कोरोना साथीच्या वेळी बहुतेक लोक घरातूनच काम करत आहेत. यामुळे लोक कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपवर अधिकाधिक वेळ घालवत आहेत. संगणक आणि लॅपटॉपवर सातत्याने काम केल्यामुळे लोकांमध्ये बर्याच प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे हातांच्या बोटांमध्ये होणाऱ्या वेदना. संगणकावर काम करत असताना कंबर किंवा मान दुखणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना सध्या हातांच्या बोटांमध्ये वेदना होण्याचा त्रास होऊ लागला आहे (Work From Home hand and finger stretching exercise).
बरेच दिवस कीबोर्ड आणि माऊसचा वापर केल्याने हात व बोटं कमजोर होऊ शकतात. अगदी बोटाच्या टोकांवर थोड्याशा दबावामुळे देखील आपल्याला वेदना जाणवू शकतात. काही व्यायाम आणि टिप्सचा उपयोग करून आपण या समस्येतून आराम मिळवू शकता.
आपण जिथेही काम करता, सर्वात प्रथम त्या जागेची उंची तपासा. संगणक किंवा लॅपटॉप आपल्या डोळ्यांच्या रेषेत समांतर असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला पाहिजे. याव्यतिरिक्त, हाताचे मनगट सपाट पृष्ठभागावर कीबोर्डच्या समांतर ठेवले पाहिजे (Work From Home hand and finger stretching exercise).
सतत काम करत असताना काही वेळाची विश्रांती घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या बोटांवरील ताण कमी होतो आणि अशा प्रकारे आपल्याला वेदनांपासून आराम देखील मिळतो. या ब्रेकदरम्यान बॉडी स्ट्रेच करून आपण इतर कोणत्याही समस्येपासून देखील मुक्त होऊ शकाल. यावेळी 5 ते 10 मिनिटे हातांचा व्यायाम करा.
हाताची मुठ बंद करून डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अस सुमारे दहा वेळा मनगट हळूवारपणे फिरवा. कमीतकमी दोन तासांत एकदा या व्यायामाची पुनरावृत्ती करा. दुसरा एखादा व्यायामसुद्धा तुम्ही करून पाहू शकता. यासाठी आपल्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांना इंटरलॉक करा आणि नंतर आपला हात हळूवारपणे वर खेचा. जर, आपल्याला बोटांनी वेदना होत असेल, तर आपण आपली मुठ देखील बंद करू शकता आणि नंतर ती उघडू शकता. थोड्या काळासाठी हा व्यायाम करू शकता. यामुळे आपल्याला वेदनांमधून आराम मिळेल.
(Work From Home hand and finger stretching exercise)
Work From Home | आनंददायी वाटणारे ‘वर्क फ्रॉम होम’ त्रासदायी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम#WorkFromHome #corona #workfromanywhere #workfromhomelife https://t.co/W0Pl9HVdtb
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020