रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण घरातून निघताना अनेक महत्वाच्या वस्तू आपल्या सोबत बॅगेत घेत असतो. परंतू महिलांना प्रवास करताना त्यांच्या सोबत बॅगेत काही वस्तू असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही कॉलेज किंवा ऑफीस जात असाल तर तरुणीच्या पर्समध्ये या वस्तू असणे हल्ली खूपच गरजेचे बनले आहे. यातील अनेक वस्तू तुम्हाला अडचणीत कामी येतील तर काही वस्तू तुमच्या सुरक्षेसाठी देखील महत्वाच्या असतात. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अर्थाजन करीत आहेत. त्यामुळे समाजात वावरताना या वस्तू खूपच गरजेच्या बनल्या आहेत. त्यामुळे अडीअडचणीत तुम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता राहणार नाही.
तरुण मुलींनी आपल्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन ठेवली पाहीजे. अनेकदा लोकल किंवा बस प्रवासात आपले कपडे उसवू शकतात, त्यामुळे सेफ्टी पिनचे एक पाकिट कायम सोबत असावे. कारण असे कपडे उसवल्याने आपल्यावर चारचौघात ओशळवाणे वाटू शकते. तसेच सेफ्टी पिनचा वापर आपल्या संरक्षणसाठी किंवा अन्य गोष्टीसाठी देखील करता येतो.
मुलींनी त्यांच्या पर्समध्ये नेहमी एक्स्ट्रा सॅनिटरी नॅपकीन ठेवावी. टॅम्पोन किंवा मॅस्टुअल कप देखील ठेवावा, आपण स्वत:ला किंवा मैत्रिणीला किंवा सहकाऱ्यांना त्याची गरज लागू शकते.
हल्ली अनेक तरुणींच्या पेहरावात बदल झाला आहे. त्यामुळे ओढणी किंवा दुप्पटा कोणी वापरत नाही. तरही तुमच्याजवळ स्कार्फ किंवा दुपट्टा तरी असायलाच हवा. जरुर असल्यावर तुम्ही स्कार्फचा वापर ऊन्हापासून संरक्षणसाठी करु शकता. आणि आपल्या ड्रेसला नवा लूक देऊ शकता.
मुलीना एकाकी पाहून अनेक टवाळखोर छेड काढण्यासाठी अनेक शहरात आणि गावात टपलेलेच असतात. अशा वेळी चिली स्प्रे तुमच्या संरक्षणासाठी खूपच फायदेशीर असतो. संकटात हा स्प्रे शुत्रूच्या डोळ्यात मारला कि काम तमात होते. तुम्ही पळून जाऊ शकता.
सध्या बहुमतांशी मुली नोकरी करुन आपल्या संसाराला किंवा आई-वडीलांना मदत करीत असतात. वर्किंग वुमनने यासाठी काही वस्तू बॅगेत किंवा पर्समध्ये नक्की ठेवाव्यात,बॅगेसत एक क्लेचर रबर बँड, लिप बाम आणि मॉश्चरायजर ठेवणे गरजेचे आहे.या काही बेसिक वस्तू आहेत.तुम्ही याहून अधिक तुमच्या गरजे प्रमाणे पर्समध्ये ठेवू शकता. ज्या वस्तू तुम्हाला किमान फ्रेश लुक देण्यासाठी मदतगार होतील.