मुंबईः जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. लोकसंख्या नियंत्रण (Population control) हे आवश्यक पाऊल आहे. सतत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन लोकांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती (Awareness about control) करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे उपासमार, बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभावही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम(Population Day theme) , इतिहास, महत्त्व याबाबत प्रत्येकाला माहीती असणे गरजेचे आहे. दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम देखील ठेवली जाते. थीम नुसार हा दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या वर्षाची थीम काय आहे? आणि या दिवसाचा इतिहास काय आहे?
या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिवसाची थीम ‘8 अब्ज जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे – सर्वांसाठी संधींचा उपयोग आणि सर्वांसाठी हक्क आणि निवडी सुनिश्चित करणे’ आहे. 2022 ची या वर्षीच्या थीम चा अर्थ म्हणजे जगाची लोकसंख्या 8 अब्जांपर्यंत पोहोचली आहे, परंतु त्या सर्वांना समान हक्क आणि समान संधी देणेही गरजेचे आहे.
जागतिक लोकसंख्या दिवसाची सुरूवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये केली होती. जगाची लोकसंख्या ५ अब्जांवर पोहोचली होती, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरच जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी साजरा केला जात आहे.
दरवर्षी या दिवशी लोकसंख्या नियंत्रण उपायांवर चर्चा केली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे देश आणि जगाला भेडसावणाऱ्या समस्यांमुळे मानवतेची आणि परिसंस्थेची हानी होत आहे. जागतिक लोकसंख्या दिन लोकांमध्ये जागरुक व्हावा म्हणून साजरा केला जातो. लैंगिक समानता, माता आणि बालकांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, नागरी हक्क, गरिबी आणि गर्भनिरोधक औषधांचा वापर यासारख्या गंभीर विषयांवर चर्चा केली जाते. वाढलेल्या लोकसंख्येचे दुष्परिणाम कोरोनाच्या वेळी स्पष्टपणे दिसत होते. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व समजून घेणे अधिक गरजेचे झाले आहे. सुरूवातीला, जागतिक लोकसंख्या दिनासोबत मानवाचा विकास आणि प्रगती साजरी करण्यात आली. मात्र आता हा दिवस केवळ वाढत्या लोकसंख्येचे नियंत्रण आणि वाढत्या लोकसंख्येतील त्रुटींची जाणीव करून देण्यासाठीच साजरा केला जातो.