भारतात तयार होणाऱ्या साड्या आज जगभर प्रसिद्ध आहेत. साडी हे केवळ पारंपारिक वस्त्र नसून हे भारतीय महिलांच्या सौंदर्याचे, प्रतिष्ठेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. पारंपारिक ड्रेस साड्यांमध्येही अनेक प्रकार आहेत. आता परदेशी महिलांना देखील आपल्या भारतीय संस्कृतीत नेसल्या जाणाऱ्या साड्या नेसायला आवडतात. तर दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जागतिक साडी दिन साजरा केला जातो.
जागतिक साडी दिवस साजरा करताना साड्यांची खासियत आणि त्या बनवणाऱ्या कारागिरांविषयी सांगणे हा त्याचा उद्देश आहे. सर्वसामान्य महिलांपासून सेलेब्सपर्यंत प्रत्येक महिल्यांच्या वॉर्डरोबमध्ये साड्या नक्कीच असतात. चला तर मग या खास दिवसानिमित्त तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या साड्यांबद्दल सांगूया. या साड्यांची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
कांचीपुरम साड्या
कांचीपुरम साड्या भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात तयार केल्या जातात. उत्कृष्ट रेशीम आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी तामिळनाडूची कांचीपुरम साडी आज जगभर प्रसिद्ध आहे. ही साडी तयार करताना सोन्या-चांदीच्या धाग्याने यावर भरतकाम केले जाते. कांचीपुरम साडी पूर्णपणे तयार झाल्यावर त्यांची किंमत लाखांपर्यंत पोहोचते. कांचीपुरम सिल्क साडीची किंमत १ लाख पासून सुरु होते ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.
पाटण पटोला साडी
पाटण पटोला साडी ही मूळची गुजरातची असलेली साडी भारतातील सर्वात महागड्या साडींपैकी एक आहे. ही पटोला साडी गुजरातमधील पाटण मध्ये बनवली जाते. ही साडी डबल इकट तंत्राने तयार करण्यात आली आहे. ही साडी तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. ६ यार्डच्या या साडीसाठी वार्प धाग्यावर टाई-डाईड डिझाइन तयार करण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. या साडीची किंमत 2 ते 10 लाख रुपये इतकी आहे.
बनारसी साड्या
बनारसी साड्या हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या साडी ब्रँडपैकी एक आहे. बनारसी साड्या बनारस (वाराणसी) मध्ये बनवल्या जातात. ते बनवण्यासाठी रेशीम धागा आणि सोने-चांदीच्या तारांचा वापर केला जातो. ही साडी परिधान केल्याने खूप रॉयल लुक येतो. काही बनारसी साड्यांची किंमत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
कोरल सिल्क साडी
कोरल सिल्क साडी ही आसामच्या पारंपारिक वेशभूषेपैकी एक आहे. ही साडी सुंदर आसामी रूपांनी सजलेली असते. ही साडी तयार करण्यासाठी यात रेशमी धागे आणि सोने- चांदीच्या तारांचा वापर केला जातो. या साड्यांची खासियत म्हणजे या सद्य वर्षानुवर्षे खराब होत नाहीत. बाजारात या साड्यांची किंमत दोन हजार रुपयांपासून सुरू होऊन दोन लाखरुपयांपर्यंत जाते
जरदोसी वर्क साडी
जरदोसी हा एक प्रकारचा हाताने तयार केलेले भरतकाम आहे, ज्यामध्ये साडीवर भरतकाम करताना सोन्या-चांदीचे धागे वापरले जातात. यामध्ये मणी, सिक्विन आणि दगडांचाही वापर केला जातो. जरदोसी कामाच्या साड्या खास लग्न समारंभासाठी किंवा खास समारंभासाठी बनवल्या जातात. याची किंमत 2 लाख ते 15 लाख आहे.