First Date ला ‘ही’ चूक कराल तर विसरून जा गर्लफ्रेंड, तुम्हीसुद्धा नका करू ‘या’ चुका!

| Updated on: Mar 30, 2023 | 11:32 PM

पहिल्या डेटवर एखादा चित्रपट पाहण्यासाठी किंवा डिनरला जात असाल तर ही कल्पना थोडी कंटाळवाणी झाली आहे.

First Date ला ही चूक कराल तर विसरून जा गर्लफ्रेंड, तुम्हीसुद्धा नका करू या चुका!
Follow us on

आजकालची तरूणाई रिलेशनशीपमध्ये येण्याअगोदर डेटींगचा पर्याय निवडतेच. त्यातच पहिल्यांदा डेटवर जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण डेटवर नक्की जायचं कुठे हा प्रश्न प्रत्येकाला पडलेलाच असतो. त्यात जर तुम्ही चित्रपटात जसं दाखवतात तसं पहिल्या डेटवर एखादा चित्रपट पाहण्यासाठी किंवा डिनरला जात असाल तर ही कल्पना थोडी कंटाळवाणी झाली आहे. पहिली डेट ही थोडी एक्सायटिंग आणि इन्टरेस्टिंग असली पाहिजे. तर आता आम्ही तुम्हाला फर्स्ट डेटसाठी कोणती ठिकाणे टाळली पाहिजेत याबाबत सांगणार आहोत.

चित्रपट बघायला जाणे

पहिल्या डेटसाठी चित्रपट पाहायला जाणं ही पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.  चित्रपट पाहायला जाणं ही पहिली डेट चांगली असू शकते. पण जरा विचार करा की, अंधाऱ्या खोलीत बसून शांततेत चित्रपट बघून तुम्ही एकमेकांना किती ओळखू शकाल?

मॅक डी वर जाणे

नुकतंच यूकेमध्ये एक सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणानुसार, पहिल्या डेटसाठी मॅकडोनल्डमध्ये जाणे खूप वाईट असू शकते. या सर्वेक्षणात तब्बल 11 हजार प्रतिसादांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर मॅकडोनल्डमध्ये जाणं टाळा.

आइस स्केटिंग

आइस स्केटिंगसाठी जाणे हे तुम्ही ज्या व्यक्तीसोबत डेटवर जायचा प्लॅन करत असाल त्यावर अवलंबून असते. कारण पहिल्या डेटवर आइस स्केटिंगला जाण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये थोडा कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे. तसंच त्या व्यक्तीला आव्हान स्वीकारण्याची सवय असावी. त्यामुळे आइस स्केटिंगला जाणे ही वाईट कल्पना असू शकते.

बारमध्ये जाणे

पहिल्या डेटवर बारमध्ये जाणे ही देखील चांगली कल्पना नाही. कारण तुम्ही किंवा तुमचा पार्टनर बारमध्ये जास्त मद्यपान करू शकता, ज्यामुळे पहिल्या डेटमध्ये गोष्टी बिघडण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे पहिल्या डेटसाठी बारवर जाणे टाळा.

बीचवर जाणे

पहिल्या डेटवर हिवाळ्यात थंड हवेत समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्याचा अनेकांचा विचार असतो. पण खरं सांगायचं तर ही कल्पना इन्टरेस्टिंग नसून, हे ठिकाण तुमच्या पहिल्या डेटसाठी अजिबात योग्य नाही.

प्राणीसंग्रहालयात जाणे

पहिल्यांदाच डेटवर जाताय आणि कुठे जाताय तर प्राणीसंग्रहालयात. डेटवर प्राणीसंग्रहालयात जाऊन प्राणी किंवा पक्षी बघून काय उपयोग?  तिथे जाऊन तुम्ही एकमेकांबद्दल जाणून घेण्याऐवजी फक्त प्राण्यांबद्दलच बोलाल. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातही जाणे टाळा.