मुंबई : बहुतेक स्त्रिया आणि मुली त्यांच्या सौंदर्याबद्दल खूपच चिंतीत असतात. त्यांना नेहमीच त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. वयाच्या 35व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसताच महिला प्रचंड घाबरायला लागतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या वस्तू वापरल्या जातात. जर आपणही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल खूप संवेदनशील असाल, तर काही योगासने करून आपण आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकाल. ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता (Yoga for face beauty and glowing skin).
आजकाल मुलींमध्ये फोटो काढताना पाऊट करण्याची खूप क्रेझ आहे. आपल्याला सोशल मीडियावर मुलींच्या ‘या’ पाऊट पोझमधील बरेच फोटो देखील पाहायला मिळतील. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, पाऊट पोझ हे एक योगासन देखील आहे, जे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील कार्य करते. यासाठी, आपल्याला आपले गाल आतून खेचून घेऊन, किमान 30 सेकंद त्याच समान स्थितीत थांबावे लागेल. यानंतर, गाल मोकळे करून काही सेकंदांसाठी थांबा. दररोज किमान 4 ते 5 वेळा हे योगासन करा.
पद्मासानावर बसण्याने चेहर्याचे तेज वाढते, तसेच सर्व शारीरिक समस्याही कमी होतात. यासाठी डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीवर आणि उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर ठेवा. आपले गुडघे जमिनीजवळ ठेवा. मणका सरळ ठेवा. शक्य असेपर्यंत या स्थितीत बसा (Yoga for face beauty and glowing skin).
जसे तोंडात पाणी भरून आपण तोंड फुगवतो, त्याचप्रमाणे तोंडात हवा भरून फुगवा आणि काही सेकंद या मुद्रेमध्येच रहा. यानंतर, तोंड उजवीकडे व डावीकडे वळवा. यानंतर, श्वास घ्या. दररोज पाच ते सहा वेळा हा व्यायाम पुन्हा-पुन्हा करा. याने आपल्या चेहऱ्याची त्वचा ताणली जाईल, त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. यासह, चेहऱ्यावरील चमक देखील वाढेल.
जर आपल्याला ‘डबल चीन’ची समस्या असेल किंवा आपला चेहरा लोंबकळलेला दिसत असेल, तर आपली हनुवटी वर उचला आणि वर आकाशाच्या दिशेने पहा. आता आपले तोंड सतत 10 ते 15 सेकंद उघडे ठेवा आणि नंतर बंद करा. त्यानंतर, चेहरा सामान्य स्थितीत आणा. दररोज 4 ते 5 वेळा हे आसन नियमित करा.
(Yoga for face beauty and glowing skin)
Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत ‘हे’ लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय कराhttps://t.co/NzeLopBrcj#Winter #LipStickTrends #LipstickShades #BeautyTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020