नवी दिल्ली : बकरीच्या दुधात अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात. बकरीच्या दूधाचे सेवन केल्यास अनेक शारीरीक समस्यांमध्ये फायदेशीर होते. बकरीचे दूध सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच शरीरात चयापचय वाढवते. याव्यतिरिक्त, ब्लड प्लेटलेटची संख्या वाढविण्यात मदत होते. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करते. (You are suffering from this problem, Consume goat’s milk, there will be amazing benefits)
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे आणि त्याच वेळी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याची देखील आवश्यकता आहे. बकरीच्या दुधात पुष्कळ पोषक तत्वे असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून तुम्ही बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे.
तज्ज्ञ सांगतात ज्याचे चयापचय योग्य नाही, ती व्यक्ती थकलेली दिसते. अशा लोकांचे मेंदूही चांगल्या प्रकारे काम करत नाही. अशा लोकांनी बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण बकरीचे दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असते. याशिवाय बकरीच्या दुधात कॉपर आणि आयर्नचे गुणधर्मही आढळतात. जे चयापचय सुधारतात. म्हणून, तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी दररोज रात्री एक कप बकरीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे.
बकरीचे दुध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. कॅल्शियमच्या अभावामुळे शरीरातील हाडांच्या समस्येमध्ये वाढ होते. अशावेळी तुम्ही बकरीच्या दुधासह 5 ग्रॅम हळद घ्यावी. हे शरीरातून कॅल्शियमची कमतरता दूर करते आणि हाडे मजबूत करते.
बकरीच्या दुधात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. पोटॅशियम अभावी, आपण बर्याच गंभीर आजारांना बळी पडतो. बकरीचे दूध रक्तदाब नियंत्रित करते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित केला जातो. म्हणून आपण बकरीच्या दुधासह मनुका खावीत.
बकरीचे दूध पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. लैंगिक शक्ती संबंधित रोगांमध्ये बकरीचे दूध खूप फायदेशीर आहे. लैंगिक शक्ती नसणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांसाठी दररोज बकरीच्या दूधात 4 ते 6 मनुका, 7 ते 8 खजूर आणि केशर उकळवा, जर केशर घरात नसेल तर आपण 5 ग्रॅम हळद देखील घालू शकता. यानंतर 20 मिनिटे दूध गरम होऊ द्या. मग झोपेण्याआधी फक्त एक कप दूध प्या. (You are suffering from this problem, Consume goat’s milk, there will be amazing benefits)
VIDEO : Special Report | नागपुरची परिस्थिती चिंताजनक, बेड मिळवण्यासाठी हॉस्पिटलबाहेर वेटिंगhttps://t.co/emjODPzAhK#CoronaVirus #NagpurCoronaUpdate #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2021
इतर बातम्या
संतापजनक! ठेकेदाराची कुचराई, भंडाऱ्यात चक्क मृतदेहावर कुत्र्यांची झुंबड
नागपुरात आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने डॉक्टरांचं धरणे आंदोलन