चांदीचे दागिने पडले काळे ? फॉलो करा या टिप्स, 15 मिनिटांत येईल चमक

| Updated on: Oct 28, 2024 | 2:01 PM

चांदीचे दागिने सतत घातले तर ते काळे पडू लागतात. पण असे दागिने साफ करणं एवढं सोपं नसतं. मात्र काही घरगुती उपाय, टिप्स फॉलो करून तुम्ही 15-20 मिनिटांत चांदीच्या दागिन्यांची चमक पुन्हा मिळवू शकता.

चांदीचे दागिने पडले काळे ? फॉलो करा या टिप्स, 15 मिनिटांत येईल चमक
Image Credit source: social media
Follow us on

सोन्या-चांदीचे दागिने बहुतांश लोकांकडे असतात. चांदीचे दागिने वापरण्याचीही बऱ्याच जणांना आवड असते. चांदीची चेन, पेंडंट, पैंजण आणि कानातल्यांचीही बरीच डिझाइन्स असतात. ते दिसतातही सुरेख, पण त्यांचा एक प्रॉब्लेम म्हणजे चांदी लगेच काळी पडते, त्यामुळे कधी ते पाहून असं वाटतं की हे दागिने किती जुने आहेत. चांदीचा हवेशी संपर्क आला की ती लगेच काळी पडते. पण ते सहज साफही करता येतात. चांदीचे दागिने साफ कसे करावेत, त्याची चमक लगेच कशी परत मिळवावी यासाठी काही सोप्या टिप्स आणि उपाय आहेत. ते जाणून घेऊया.

बेकिंग सोडा आणि पाणी –

हा उपाय बहुतांश चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून चांगली पेस्ट बनवा आणि ती दागिन्यांवर लावून 15-20मिनिटे तसेच राहू द्या.थोड्या वेळाने दागिने कोमट पाण्याने धुवा. ते नव्यासारखे चमकू लागतील.

लिंबू आणि मीठ

चांदीच्या दागिन्यांवरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ लावू शकता. एका भांड्यात मीठ घ्या, त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळा. आता ही मीठ-लिंबाच्या रसाची पेस्ट दागिन्यांवर लावा आणि 10-15 मिनिटे ठेवून द्या. नंतर दागिने कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर दागिने कोरड्या कपड्याने पुसून पाणी टिपून घ्या. चमक परत येऊन दागिने वापरायला तय्यार..

व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण

चांदीचे दागिने वारंवार काळे पडत असतील आणि त्याला नव्याप्रमाणे चमकवायचे असेल तर स्वयंपाकघरातील व्हिनेगरचाही तुम्ही वापर करू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळून एक छान द्रावण तयार करा. आता तुमचे दागिने 10-15 मिनिटे त्यात बुडवून ठेवा. थोड्या वेळाने ते पुन्हा कोमट पाण्याने धुवा आणि कापडाने पाणी टिपून कोरडे करावे. या उपायानेही तुमचे दागिने पूर्वीसारखे चमकतील आणि नवे दिसतील. याशिवाय तुम्ही सिल्व्हर पॉलिश करून घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. )