Health Tips : हार्मोन्स खुश तर शरीरही राहील तंदुरूस्त, दररोज खा हे पदार्थ !

| Updated on: Aug 07, 2023 | 5:01 PM

शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर केसगळती आणि त्वचेच्या समस्यांसह अनेक प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागू शकतो. हार्मोन्सचे संतुलन कसे राखावे, ते जाणून घेऊया.

Health Tips : हार्मोन्स खुश तर शरीरही राहील तंदुरूस्त, दररोज खा हे पदार्थ !
Follow us on

Hormones Balance  : आपल्या शरीरात हार्मोन्सची (hormones) महत्वपूर्ण भूमिका असते. शरीरात सतत हार्मोन्समध्ये बदलही होत असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात ते जास्त लवकर बदलतात. हार्मोन्सच्या बदलांचा (hormonalchanges) थेट परिणाम शरीरावरही दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हार्मोन्स आपल्या रक्तातून शरीरात पोहोचतात. मात्र ते नीट पोहोचले नाही तर त्यांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे अनेक शारीरिक त्रास होऊ शकतात.

त्यामुळे खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष दिले तर हार्मोन्सचा बॅलन्स बिघडत नाही. काही पदार्थ खाल्ल्याने हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.

ब्रोकोली

हिरव्या भाज्यांमधील सर्वात लोकप्रिय असलेली बोर्कोली ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्यासह अनेक महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. ब्रोकोली नियमित खाल्ल्याने हार्मोन्सशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश जरूर करावा.

टोमॅटो

आजकाल टोमॅटो प्रचंड महाग झाले आहेत. पण हेच टोमॅटो हार्मोनल लेव्हल नियंत्रित राखण्यात महत्वाचे ठरतात. ते खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, कॉम्प्लेक्स बी के व्हिटॅमिन आणि कोलीन सारखी पोषक तत्वे असतात. औ

ॲवाकॅडो

ॲवाकॅडो देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आपला आजारांपासून बचाव करतात. ॲवाकॅडो
खाल्ल्याने हार्मोन्स ॲक्टिव्ह होतात व ते संतुलित राहण्यास मदत होते. हे खाल्ल्याने शरीरात कोणतीही हार्मोनल समस्या उद्बवत नाही.

पालक

हार्मोन्सशी संबंधित समस्यांमध्येही पालक फायदेशीर ठरू शकतो. त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. याशिवाय अनेक आजारांपासूनही आपण दूर राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)