नवी दिल्ली : उन्हाळ्यात (hot sumeer) त्वचेची अधिक काळजी घेणे (skin care) गरजेचे असते. सनबर्नपासून ते मुरुमांपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा या ऋतूमध्ये सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त असतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीही वापरून पाहू शकता. यामुळे उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होईल. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड (hydrated) राहील. तसेच याच्या मदतीने तुम्ही त्वचेला उन्हापासून वाचवू शकाल.
केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने आणि महागड्या उत्पादनांच्या वापराशिवायही तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे खोलवर पोषण होईल. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता ते जाणून घेऊ या.
सनस्क्रीनचा वापर करा
उन्हाळा असो किंवा हिवाळा , त्वचेसाठी सनस्क्रीन नेहमीच वापरले पाहिजे. सनस्क्रीन हे अतिनील किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते. या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर दर 2 ते 3 तासांनी सनस्क्रीन नक्कीच वापरा.
हायड्रेटेड रहावे
आपली त्वचा बाहेरून हायड्रेटेड ठेवण्यासोबतच आतूनही त्वचेला हायड्रेट ठेवा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. त्वचेला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. तसेच आहार जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करावा. तसेच काकडी, कलिंगड यासारख्या पदार्थांचेही तुम्ही सेवन करू शकता.
एक्सफोलिएट करावे
त्वचा एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. त्वचेसाठी तुम्ही होममेड स्क्रब देखील वापरू शकता. यामुळे त्वचेची छिद्र स्वच्छ राहू शकतील.
कठोर रासायनिक उत्पादनांचा वापर करणे टाळावे
कठोर रसायने असलेली उत्पादने त्वचेचे नैसर्गिक तेल काढून घेतात. त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. त्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही असे पर्याय निवडा. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे.
नैसर्गिक उपाय
सनबर्नचा त्रास झाल्यास आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेचा त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर होण्यासही मदत मिळते. तसेच तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता.