पावसात भिजल्याने सुटते सारखी खाज ? मग करा हा रामबाण इलाज

| Updated on: Jul 08, 2023 | 3:32 PM

पावसात भिजल्यानंतर तुमच्याही हाता-पायाला, मानेला खाज सुटते का ? तीव्र खाजेचा त्रास होत असेल आणि त्यापासून सुटका हवी असेल तर एक उपाय नक्कीच गुणकारी ठरेल.

पावसात भिजल्याने सुटते सारखी खाज ? मग करा हा रामबाण इलाज
Image Credit source: freepik
Follow us on

Itching Remedies : पावसाळ्याच्या ऋतूत भिजल्यानंतर काही लोकांच्या शरीराला खूप खाज (itching problem) सुटते. ही खाज कधी कधी इतकी तीव्र असते की खाज सुटलेल्या ठिकाणी जखमाही तयार होतात. खरे तर या ऋतूत हवेतील आर्द्रता वाढल्याने खाज सुटते. याशिवाय घाम, (sweating) कपड्यांचा पोत यामुळेही खाज सुटू शकते. मान, चेहरा, हात, पायाचे तळवे आणि हाताखालील भागात म्हणजेच काखेत जास्त खाज येते.

बदलत्या हवामानामुळे होणारी ही खाज दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि लोशन लावण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यानंतरही खाज सुटण्याची समस्या बरी होतेच असं नाही. तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर खाली नमूल केलेले घरगुती उपाय करून पहा, ज्यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळेल.

नारळाचे तेल

नारळाचे तेल किंवा खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्याचा वापर हा खाज, इन्फेक्शन आणि त्वचेवर पुरळ येण्याच्या समस्येपासून लवकर आराम देण्यासाठी गुणकारी ठरतो. याशिवाय खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉयश्चरायझर देखील आहे. हे त्वचेमध्ये फिलाग्रिनचे प्रमाण वाढवते, ते एक प्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पीएच संतुलनही राखले जाते.

खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून खाज येणा-या ठिकाणी लावा. लवकर आराम मिळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी आंघोळीनंतर देखील हे तेल लावावे. खोबरेल तेल हे त्वचेच्या संसर्गासाठी सर्वात प्रभावी उपाय मानले जाते, त्याचा वापर अनेक शतकांपासून केला जातो

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)