Food for skin : खायचे हे पदार्थ त्वचेवर लावताच दूर होतील अनेक Skin Problems, जाणून घ्या वापराची पद्धत

| Updated on: Mar 04, 2023 | 3:42 PM

आपल्या आहारात असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने आपण निरोगी राहतोच पण ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या समस्याही दूर होतात आणि नैसर्गिक चमक परत येऊ लागते.

Food for skin : खायचे हे पदार्थ त्वचेवर लावताच दूर होतील अनेक Skin Problems, जाणून घ्या वापराची पद्धत
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : आजारांपासून दूर राहण्यासाठी शरीर निरोगी ठेवणे आवश्यक असून योग्य आहार आणि नियमित व्यायामानेच आपली तब्येत (good health) चांगली राहू शकते. म्हणूनच आपल्यासाठी सर्वात आरोग्यदायी आहार कोणता आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या गोष्टी लावल्याने फायदा होईल, हेही माहीत असणे महत्वाचे ठरते. आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे, खराब वातावरणामुळे त्वचेची नैसर्गिक चमक सतत हरवत चालली आहे, ज्याची लवकरात लवकर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे पदार्थ आपल्या शरीराला निरोगी ठेवतात, तेच पदार्थ त्वचेलाही खूप फायदे (food for skin) देतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे त्वचा निरोगी ठेवतील आणि तिची नैसर्गिक चमक (natural glow) परत आणतील.

ओट्स

ओट्सचे नाव सर्वात आरोग्यदायी पदार्थांमध्येही येते. याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वे मिळतात. त्याचप्रमाणे ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही दोन चमचे मध किंवा पाण्यात भिजवलेले ओट्स चेहऱ्यावर लावू शकता. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा, त्याने आराम मिळेल.

हे सुद्धा वाचा

कच्च्या भाज्या

ज्या भाज्या कच्च्या खाल्या जातात, त्यात त्वचेसाठी नैसर्गिक मास्क म्हणून काम करतात. गाजर, काकडी, बीटरूट आणि टोमॅटो यासारख्या गोष्टी चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होते व त्वचेला नैसर्गिक चमकही मिळते. तुम्ही या सर्व भाज्या मिक्स करू शकता किंवा कोणतीही एक भाजी बारीक करून त्याची पेस्ट तयार करून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.

ताजी फळं

भाज्यांप्रमाणेच फळांचाही त्वचेवर वापर केला जाऊ शकतो. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जे शरीराला विविध फायदे देखील देतात. पपई, सफरचंद, संत्रा, किवी आणि बेरी यांसारखी काही फळे फेस पॅक तयार करण्यासाठी आणि चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरली जाऊ शकतात. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात आणि नैसर्गिक चमकही येते.

तांदूळ

त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवरही तांदूळ खूप फायदेशीर आहे. उकडलेले तांदूळ मॅश करून त्यात थोडे मध आणि गुलाबपाणी टाकून ते चेहऱ्यावर लावता येते. याशिवाय, कोरडे तांदूळ बारीक करून आणि त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार केली जाऊ शकते, ती लावल्यामुळे तुमच्या त्वचेला विविध फायदे मिळतात. विशेषतः चेहऱ्याची हरवलेली चमक नैसर्गिक पद्धतीने परत आणण्यासाठी तांदूळ खूप फायदेशीर ठरतो.

कॉफी

कॉफी पावडरचा वापर केवळ त्वचेला चमक आणण्यासाठीच नव्हे तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. कॉफी पावडरचा स्क्रब म्हणून वापर केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक परत येऊ लागते. तसेच, कॉफी पावडर त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि ऑईल बॅलेन्स सुधारते.