नवी दिल्ली : रोजच्या प्रदूषणामुळे (pollution) आणि धुळीमुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान (skin damage) होते. सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे, त्वचेचे झपाट्याने नुकसान देखील होऊ शकते आणि तिची चमक गायब होऊ शकते. त्वचा निस्तेज (dull skin) होण्यापासून वाचवण्यासाठी जर तुम्ही नियमितपणे फेशिअल (facial) केले तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा निस्तेज होण्यापासून प्रतिबंधित करते आणि सुरकुत्या इत्यादी समस्याही नियंत्रित करते. पण काही लोकांची समस्या असते की फेशिअल केल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावर चमक येत नाही आणि फायदाही होत नाही. काही चुकांमुळे फेशिअलचा प्रभाव कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते.
फेशिअल केल्यावर या चुका करणे टाळा
चेहऱ्याला वारंवार हात लावणे
फेशिअल केल्यानंतर चेहऱ्याला पुन्हा-पुन्हा स्पर्श केल्यास हातांचे इन्फेक्शन त्वचेपर्यंत पोहोचते आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा.
मेकअप करणे
फेशिअल केल्यानंतर लगेच मेकअप केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाणार असाल तर दोन ते तीन दिवस अगोदर फेशिअल करून घ्या. असे केल्याने, फेशिअल नंतर उघडलेली छिद्रांचा मेकअपच्या रसायनांपासून बचाव होऊ शकतो आणि तुम्ही तुमची त्वचा खराब होण्यापासून रोखू शकता.
फेस वॉश किंवा स्क्रब करू नका
फेशिअल केल्यानंतर किमान 4 ते 6 तास फेसवॉश चेहऱ्यासाठी वापरू नये किंवा चेहरा धुवू नये. तुम्हाला तुमचा चेहरा धुण्याची गरज असल्यास, चेहऱ्यावर फक्त पाणी शिंपडा आणि तुमचा चेहरा स्वच्छ करा. तसंच लक्षात ठेवा की टॉवेलने त्वचा जास्त घासू नका आणि स्क्रब करणेही टाळा. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि फेशिअल चा प्रभाव कमी होतो.
उन्हात बाहेर जाणे टाळा
फेशिअल केल्यानंतर लगेच उन्हात जाणे टाळणे आवश्यक आहे. फेशियल केल्यानंतर त्वचा अधिक नाजूक होते आणि सूर्यप्रकाश, धूळ किंवा इतर घाण तिच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही ॲलर्जीपासून बचाव करण्यासाठी फेशिअल केल्यानंतर सूर्यप्रकाश टाळा.
वॅक्सिंग करू नका
जर तुम्हाला चेहऱ्यावर वॅक्सिंग करायचे असेल तर ते फेशिअल करण्यापूर्वी करून घ्यावे, ते योग्य ठरते. खरंतर, फेशिअल केल्यानंतर काही तास त्वचा संवेदनशील राहते. अशा परिस्थितीत चेहऱ्याला वॅक्स लावल्यास त्वचेला इजा होऊ शकते.