Tea Tips | चहा पिताना तुम्हीही करताय का ‘या’ चुका? ठरतील आरोग्यासाठी हानिकारक…

| Updated on: Dec 11, 2020 | 10:39 AM

चहा पिताना आपण काही चुका करतो, या चुका आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. सकाळी प्लास्टिकच्या कपात चहा पिणे, चहासह अंडी खाणे किंवा अधिक गरम चहा पिणे हानिकारक आहे.

Tea Tips | चहा पिताना तुम्हीही करताय का या चुका? ठरतील आरोग्यासाठी हानिकारक...
Follow us on

मुंबई : बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने (sip of tea) करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. मात्र, जास्त चहा पिणे देखील आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. चहामध्ये कॅफिन असते. ज्याच्या अधिक सेवनामुळे कर्करोग, अल्सर आणि इतर शारीरक रोगांचा धोका वाढतो (You should avoid this thing while taking sip of tea).

चहा पिताना आपण काही चुका करतो, या चुका आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. सकाळी प्लास्टिकच्या कपात चहा पिणे, चहासह अंडी खाणे किंवा अधिक गरम चहा पिणे हानिकारक आहे. एका संशोधनानुसार जास्त गरम चहा पिण्यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. दररोज जास्त गरम चहा प्यायल्याने आपल्या घश्याच्या ऊतींचे नुकसान होते, ज्यामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

डिस्पोजल कपमध्ये चहा पिऊ नका.

प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये चहा पिऊ नये. अशा कपांवर असलेल प्लास्टिकचे सूक्ष्म कण आपल्या पोटात जातात. आयआयटी खडगपूरच्या एका संशोधन अभ्यासानुसार हे गोष्ट सिद्ध झाली आहे. यामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते.

चहाबरोबर बेसन युक्त पदार्थ खाऊ नका.

बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेल्या पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचक शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते (You should avoid this thing while taking sip of tea).

लिंबू

आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे चहासह अंडी, ऑमलेट खाणे बर्‍याच लोकांना आवडते. हे देखील आपल्या आरोग्यास हळूहळू हानी पोहोचवू शकते.

अति चहा सेवनाचे दुष्परिणाम

  1. तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असाल तर, प्रोस्टेट कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.
  2. उपाशी पोटी चहा घेण्याने अॅसिडिटी होऊ शकते.
  3. लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होत.
  4. चहामध्ये भरपूर टॅनिन असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे कधीकधी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.
  5. अति चहा पिणे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे.
  6. चहाच्या अति सेवनाने आतड्यांवर परिणाम होतो.
  7. जास्त चहा पिण्यामुळे निद्रानाश होतो.
  8. चहाच्या अति सेवनाने कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर वाढते.

(You should avoid this thing while taking sip of tea)