बहुतेक लोकं डॉग लव्हर्स असतात. त्यामुळे लोकांना घरात पाळीव कुत्री पाळण्याची खूप आवड असते. तसंच अलीकडच्या काळात कुत्रे पाळण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. लोकं कुत्र्यांची काळजी आपल्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त घेतात. पण तुम्हाला माहितीये का, की तुम्ही पाळलेले कुत्रा तुमच्याकडून काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. यासाठी त्याला कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज लागत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नक्की आहेत तरी काय.
1. मूलभूत आदेश
तुमचे पाळीव कुत्रे तुमच्याकडून मूलभूत आज्ञा शकतात. जसे की उठणे, बसणे आणि त्याला हाक मारल्यानंतर लगेच येणे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला हाक मारता किंवा काहितरी आज्ञा देता तेव्हा तुमचा कुत्रा सुद्धा त्यांना पाहून या गोष्टी शिकतो.
2. सामाजिक कौशल्ये
तुमच्याकडून तुमचा पाळीव कुत्रा सामाजिक कौशल्ये शिकत असतो. तुम्ही दररोज तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी कसे वागता हे त्याला समजत असतं. तसंच त्याला दुसर्या लोकांशी आणि बाहेरच्या कुत्र्यांसोबत कसं वागायचं हे समजतं.
3. तुमची पर्सनॅलिटी
कुत्र्यांबाबत विशेष सांगायचं झालं तर, ते आपल्या मालकाची पर्सनॅलिटी फार लवकर अंगीकारतात. जर तुम्ही रागीट असाल तर तुमच्या कुत्र्याचे व्यक्तिमत्त्वही तसेच होऊ शकते. तसंच आळशी मालकाचा कुत्रा हा थोडा कमी चपळ असू शकतो.
4.भावना
तुमचा पाळीव कुत्रा तुमचा मूड आणि भावना देखील लगेच समजू शकतो. तुमचा स्वभाव जसा असेल, तसंच तुमचा कुत्राही वागेल. त्यामुळे त्याच्यासमोर तुमचा मूड कसा ठेवायचा हे तुमच्याच हातात आहे.
5. शाब्दिक संवाद
कुत्र्यांना सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जाते. कुत्रा त्याच्या मालकासोबत राहत असताना, तो मालकाचा शाब्दिक संवाद समजून घेण्यास शिकतो. जर तुम्ही त्याला कोणत्याही ठिकाणी जायला सांगितले तर त्याला पटकन समजतं आणि तो तुमची आज्ञाही पाळतो.
6.सरळ मार्गाने चालणे
तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुम्ही कसे चालता याचं निरीक्षण तुमचा कुत्रा करत असतो. तसंच तुम्ही रस्त्याने जाताना अपघात टाळण्यासाठी एका बाजूने चालता, ते पाहून धोका ओळखून तुमचा कुत्राही त्याच ठिकाणी धावेल.