Buldana Lok sabha result 2019 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघ निकाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ : शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव बुलडाणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते. प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं होतं. याठिकाणी यंदा 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी […]

Buldana Lok sabha result 2019 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघ निकाल
बुलडाणा : प्रतापराव जाधव
Follow us on

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव बुलडाणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते. प्रतापराव जाधव आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं होतं. याठिकाणी यंदा 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची टक्केवारी 63.53 टक्के होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2.18 टक्क्यांनी मतदान वाढले. हे वाढलेले 2.18 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे निश्चित नसल्याने या मतदारसंघात चांगलीच धाकधूक लागली होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाप्रतापराव जाधव (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीराजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरबळीराम सिरस्कार (VBA)पराभूत

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ तसा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहेच. कारण हा मतदारसंघ गेल्या 4 पंचवार्षिकपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. या याठिकाणावरून 1999, 2004 मध्ये शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ हे खासदार झाले. तर त्यानंतर शिवसेनेचे  प्रतापराव जाधव हे 2009, 2014 मध्ये असे 2 वेळा खासदार झाले. त्यापूर्वी  याठिकाणावरुन काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी निवडणूक लढवून खासदार झाले होते. शिवाय वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यावर डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील पहिला उमेदवार बुलडाणा येथून माळी समाजाच्या मेळाव्यातून घोषित केला. बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी जाहीर केली होती.

महायुतीमधील शिवसेना आणि आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष या याठिकाणी आमनेसामने होते. या दोघांत चुरशीची लढत झाली. मात्र वंचित बहुजन आघाडी ही तितकीच महत्वाची होती. कारण या ठिकाणी भारिपचे बऱ्यापैकी बस्तान आहेच. तर विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये  विकासकामांसंदर्भात असलेली नाराजी आणि डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यावर जिल्हा बँक बुडवल्याचा ठपका आहे. मात्र आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्याने प्रदेशाध्यक्ष  रविकांत तुपकर यांनी शिंगणे यांचा जोमात प्रचार करुन हवा केली होती. बळीराम शिरस्कार यांच्याकडे फक्त कल होता तो दलित, मुस्लिम मतांचा.

या मतदारसंघात निवडणूक लागल्यापासून फारशी रंगत नव्हती. मात्र रवीकांत तुपकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणेसाठी केलेला प्रचार हा शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या जिव्हारी लागला. कारण तुपकर यांनी थेट प्रतापराव आणि त्यांच्या नात्यागोत्यांवर हल्ला केला. प्रतापरावांनी केलेल्या विकास कामांवर ही प्रश्न उपस्थित केला.

प्रचारात गाजलेले मुद्दे

प्रचारात गाजलेले मुद्दे म्हणजे जिल्ह्यातील रखडलेला जालना -खामगाव रेल्वेमार्ग, सिंचन, कर्जमाफी, पीक विम्याचे न मिळालेलं पैसे, रोजगार, जिल्हा बँक हे होते. या मतदारसंघात शरद पवार , छगन भुजबळ , जयंत पाटील , उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील, बाळासाहेब आंबेडकर या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या.

यावेळी त्यांनी जिल्हावासीयांना अनेक आश्वसनं दिली, त्यात रखडलेलं सिंचन वाढवण्यासोबतच जिगाव प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वसन दिलं. रखडलेला जालना – खामगाव रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वसन दिले. लोणार , सिंदखेड राजा , शेगाव या याठिकाणचा विकास करण्याचे आश्वसन दिले. तर येणाऱ्या काळात सत्ता आल्यास संपूर्ण कर्जमाफी देण्याचे ही आश्वासन मिळाले.

विधासनभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची टक्केवारी

 बुलडाणा लोकसभा मतदारसंघ

विधानसभा             2014 मतदान %       2019 मतदान % 

बुलडाणा                 59.83 %                55.39 %

चिखली                  68. 20 %                62.75 %
मेहकर                    60 .11 %                64.68 %
सिंदखेड राजा           65.00%                  63.78 %

खामगाव                 73.82 %                  67.76 %

जळगाव जामोद       68. 58 %                  67.44 %

एकूण –                  61.35 टक्के                     63.53 टक्के   

2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीकडून डॉ राजेंद्र शिंगणे हे आमनेसामने होते. मात्र त्यावेळी डॉ राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता. तर आता यावेळीसुद्धा याच दोघात प्रमुख लढत होत आहे. 2019 मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 58 हजार 943 मतदार होते. त्यापैकी 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर  2014 मध्ये एकूण  9 लाख 78 हजार 626 मतदारांनी हक्क बजावला होता. म्हणजेच यावेळी 2.18 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.