Jalna Lok sabha result 2019 : जालना लोकसभा मतदारसंघ निकाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

जालना लोकसभा मतदारसंघ : जालना लोकसभा मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. जालना लोकसभा निकाल जालना  लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 64.50  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये  मतदानाचा टक्का पावणे दोन  टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला […]

Jalna Lok sabha result 2019 : जालना लोकसभा मतदारसंघ निकाल
Follow us on

जालना लोकसभा मतदारसंघ : जालना लोकसभा मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. जालना लोकसभा निकाल जालना  लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 64.50  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये  मतदानाचा टक्का पावणे दोन  टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपाकडून  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसकडून विलास औताडे  आणि वंचित बहुजन आघाडीकडून शरदचंद्र वानखेडे  यांच्यात तिरंगी लढत झाली.

जालना लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारावसाहेब दानवे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीविलास औताडे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक लढत

महाराष्ट्रातील राजकीय दृष्या रंगतदार लढत म्हणून जालन्याची लढत पाहिली जाते. एकीकडे लोकसभेवर  सलग चार वेळा निवडून गेलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  तर दुसरीकडे काँग्रेसकडून सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे असलेले विलास औताडे  आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे अशी लढत इथे झाली.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत जालना लोकसभा 2019 मध्ये मतदारसंघात 1.70 टक्के कमी म्हणजेच पावणे दोन टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

विधानसभानिहाय 2014  मतदानाची आकडेवारी

जालना लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघनिहाय  2014 मधील मतदान टक्केवारी

मतदारसंघ –         एकूण मतदान       टक्केवारी

1..जालना  –         153116            54.10

2..बदनापूर  –        180072            66.60

3..भोकरदन-        185110            71.43

4…सिल्लोड-        179679           67.38

5…फुलंब्री-          189597            68.76

6…पैठण –          177952           69.92

एकूण  झालेले मतदान 1065526

जालना लोकसभेत विधानसभा निहाय उमेदवाराना मिळालेली मते – 2014

रावसाहेब दानवे

  1. जालना – 83757
  2. बदनापूर  -105011
  3. भोकरदन- 99985
  4. सिल्लोड-97468
  5. फुलंब्री- 104248
  6. पैठण – 100380

एकूण रावसाहेब दानवे यांना मिळालेलं मतदान – 5 लाख 90 हजार 849

विलास औताडे, काँग्रेस

1..जालना  – 54458

2..बदनापूर  -58080

3..भोकरदन- 71747

4…सिल्लोड-67749

5…फुलंब्री- 70989

6…पैठण – 61488

एकूण विलास औताडे यांना मिळालेलं मतदान – 3 लाख 84 हजार 511

रावसाहेब दानवेंना 2014 मध्ये मताधिक्य मिळालेले

1..जालना  – 29299

2..बदनापूर  -46931

3..भोकरदन- 28238

4…सिल्लोड-29719

5…फुलंब्री- 33259

6…पैठण – 38892

रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळालेले – 206338

2019 मधील मतदान टक्केवारी

जालना लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ निहाय  2019 मधील मतदान टक्केवारी

जालना  – 52.82 टक्केवारी

भोकरदन –  69.01

बदनापूर  – 67.52

पैठण – 69.16

फुलंब्री 66.34

सिलोड  – 63.26

एकूण  64.50 टक्केवारी

2014 मधील जालना  लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 93 हजार 50 मतदारांपैकी 10 लाख 65 हजार 526 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

स्त्री मतदार – 744664

पुरुष मतदार – 864686

त्यामुळे 2014 च्या तुलनेत  2019 मध्ये मतदानात पावणे दोन टक्क्यांनी घट झाली. जालना विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. ज्याची टक्केवारी 52.82 होती.