कल्याण लोकसभा मतदारसंघ : कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 44.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात फाईट झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे या मतदारसंघात जड असल्याचं सुरुवातीपासूनच मानलं गेलं. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याने, श्रीकांत शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी जाईल असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं. अखेर झालंही तसंच, श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला.
कल्याण लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
अपक्ष/इतर | पराभूत | |
भाजप/शिवसेना | श्रीकांत शिंदे (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) | पराभूत |
कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामिण, डोंबिवली आणि मुंब्रा-कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 22 हजार 046 इतके मतदार होते.
2014 चा निकाल
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 4.40 लाख मते मिळाली तर आनंद परांजपे यांना 1.90 लाख मते मिळाली होती.