ठाणे लोकसभा मतदारसंघ : ठाणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 50 टक्के मतदानाची नोंद झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात लढत झाली. राजन विचारेंचा जनसंपर्क दांडगा असून, ठाण्यात शिवसेनेची संघटना बांधणीही उत्तम मानली जाते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा शिवसेनेला दरवेळी होत आला आहे. अखेर या मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली.
ठाणे लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
अपक्ष/इतर | मल्लिकार्जुन पुजारी (VBA) | पराभूत |
भाजप/शिवसेना | राजन विचारे (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | आनंद परांजपे (राष्ट्रवादी) | पराभूत |
2014 मधील निकाल
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा तब्बल 2.80 लाख इतक्या मताधिक्यांनी पराभव केला होता. राजन विचारे यांना 5.95 लाख मते मिळाली होती तर संजीव नाईक यांना 3.14 लाख मते मिळाली होती.