क्रिकेट खेळताना प्रायव्हेट पार्टवर चेंडू आदळला; पीचवर कोसळलेला ‘तो’ उठलाच नाही..

| Updated on: May 06, 2024 | 9:01 AM

सध्या आयपीएलचा मौसम असून अनेक क्रिकेटप्रेमी या खेळाचा आनंद घेत आहेत. काहीजण तर मैदानावर जाऊनही क्रिकेट खेळताना दिसतात, मित्रांसोबत क्रिकेट खेळत कसा वेळ जातो तेच समजत नाही. पण याचदरम्यान पुण्यात मात्र क्रिकेट खेळणे एका मुलाच्या जीवावरच बेतलं.

क्रिकेट खेळताना प्रायव्हेट पार्टवर चेंडू आदळला; पीचवर कोसळलेला तो उठलाच नाही..
Follow us on

सध्या आयपीएलचा मौसम असून अनेक क्रिकेटप्रेमी या खेळाचा आनंद घेत आहेत. काहीजण तर मैदानावर जाऊनही क्रिकेट खेळताना दिसतात, मित्रांसोबत क्रिकेट खेळत कसा वेळ जातो तेच समजत नाही. पण याचदरम्यान पुण्यात मात्र क्रिकेट खेळणे एका मुलाला अतिशय महागात पडलं. पुण्यात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलेल्या एका मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर बॉल जोरात आदळला आणि तो पीचवरच खाली कोसळला. त्यानंतर तो पुन्हा उठलाच नाही. या दुर्दैवी घटनेत अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

बॉल लागला आणि तो खाली कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना पुण्याच्या लोहगाव येथील जगद्गुरू स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. शौर्य उर्फ शंभू असे मृत मुलाचे नाव असून तो अवघ्या 11 वर्षांचा होता. शाळेला सुट्टी लागल्यानंतर शौर्य हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी जायचा. घटनेच्या वेळीदेखील ( गुरूवारी) तो रात्री उशीरापर्यंत क्रिकेट खेळत होता. त्याने टाकलेल्या एका चेंडूवर समोरच्या बॅट्समनने जोरदार शॉट मारला आणि दुर्दैवाने तो बॉल शौर्यच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात आदळला. हा आघात एवढा जोरदार होता की शौर्य जागच्या जागीच खाली कोसळला आणि पुन्हा उठूच शकला नाही.

काही वेळ तो तसाच खाली झोपला होता. त्याला लागल्याचे पाहून त्याचे मित्र तातडीने धावून आले. पण त्यांना काहीच समजलं नाही, त्यांनी तेथील इतर मुलांना मदतीसाठी बोलावलं. त्यांनी तातडीने शौर्यला उचललं आणि उपचारांसाठी दवाखान्यात नेलं. पण दुर्दैवाने तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी शौर्य उर्फ शंभू याला मृत घोषित केलं. आपल्या मुलाच्या मृत्यूचे वृत्त ऐकताच त्याच्या कुटुंबियांच्या पायाखलची जमीनच सरकली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे समूज शकेल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.