देशातील 131 शहरे सर्वाधिक प्रदुषित, महाराष्ट्रातील ही 19 शहरे प्रदूषित

| Updated on: Mar 01, 2023 | 12:51 PM

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी लोकसभेत सादर करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश आहे.

देशातील 131 शहरे सर्वाधिक प्रदुषित, महाराष्ट्रातील ही 19 शहरे प्रदूषित
mumbai pollution
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : देशातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे अनेकांचे बळी जात आहेत. हवा प्रदूषित झाल्याने श्वसन संस्थेशी संबंधित आजारात वाढ होत आहे. देशातील 131 शहरे अशी आहेत, ज्यांच्या हवेत श्वास घेणे म्हणजे साक्षात विष प्राशन करण्यासारखे असल्याचे म्हटले जात आहे. धक्कादायक म्हणजे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आला आहे. तर पाहूयात महाराष्ट्रातील कोण कोणती शहरे आहेत सर्वाधिक प्रदूषित…

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी लोकसभेत जाहीर करण्यात आली आहेत. देशातील 131 शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यातील सर्वात जास्त शहरे महाराष्ट्रातील आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा नंबर आला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आंध्रप्रदेशचा नंबर लागला आहे. सरकारने यापैकी सर्वाधिक 19 शहरांची आकडेवारी जाहीर केली आहे.

लोकसभेत दिली माहिती…..

लोकसभेत एका सदस्याने विचारलेल्या एका प्रश्नावर ही माहिती सादर करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. देशातील 24 राज्यातील 131  शहरातील प्रदूषणाची पातळी खूपच वाढली आहे. त्यापैकी 19 शहरे तर अधिकच धोकादायक पातळीच्या प्रदूषणाचा सामना करीत आहेत. या शहरांना नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या शहरातील AQI पातळीचे सातत्याने निरीक्षण केले जात आहे. सरकारने साल 2025-26 पर्यंत या शहरातील प्रदूषण 40 टक्क्यांपर्यंत घटविण्याचे टार्गेट टेवले आहे. हे टार्गेट नॅशनल एंबियंट एअर क्वालीटी स्टॅंडर्ड्सनूसार निश्चित केले आहे.

प्रदूषित शहरापैकी बहुतांशी शहरांची लोकसंख्या 80 लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रात 19 सर्वात जास्त प्रदुषित शहरे आहेत, उत्तरप्रदेशात 17, आंध्रप्रदेशात 13 , पंजाबात 9 , मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडीशातील प्रत्येकी सात शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.

ही आहेत सर्वात प्रदूषित शहरे…

अकोला, अमरावती, संभाजीनगर ( औरंगाबाद ) , बदलापुर, चंद्रपुर, जळगांव, जालना, कोल्हापुर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापुर, ठाणे, वसई विरार आणि उल्हासनगर ही महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरे बनली आहेत.

उत्तर प्रदेशातील आगरा, इलाहाबाद, अनपारा, बरेली, फिरोजाबाद, गजरौला, गाजियाबाद, गोरखपुर, झांसी, कानपुर, खुर्जा, लखनऊ, मोरादाबाद, नोएडा, रायबरेली, वाराणसी आणि मेरठ ही शहरे प्रदूषित आहेत.

आंध्र प्रदेशातील अनंतपुर, चित्तूर, एलुरू, गुंटूर, कडापा, कुरनूल, नेल्लोर, ओन्गोले, राजामुंद्री, श्रीकाकुलम, विजयवाड़ा, विशाखापट्टनम आणि विजयानगर  पंजाबातील अमृतसर, डेरा बाबा नानक, डेरा बस्सी, गोबिंदगढ़, जालंधर, खन्ना, लुधियाना, नयानांगल आणि पटीयाला  ओडिशा, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी सात शहरे प्रदुषित आहेत.