Marathi News Maharashtra 15 authentic rare paintings of chhatrapati shivaji maharaj preserved in museums around the world
हा वारसा परत कधी येणार? जगातील वस्तुसंग्रहालयात जतन केलेली छत्रपती शिवरायांची अस्सल दुर्मिळ चित्रे
छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्सल आणि दुर्मिळ अशी छायाचित्रे जगभरातल्या वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. शिवाजी महाराज यांच्या वस्तू, त्यांची चित्रे हा खरे तर भारताचा वारसा आहे. मात्र, ही चित्रे किंवा त्यांच्या वस्तू भारतात परत आणण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
1 / 13
वा. सी बेंद्रे यांनी हे चित्र कॉलिंग मकेंझी या ब्रिटिश इतिहासकाराच्या मकेंझी कलेक्शन या ग्रंथातून 1920 साली कॉपी करून भारतात आणले. मकेंझी कलेक्शनमधील शिवरायांचे हे चित्र 1826 साली प्रकाशित झाले होते. फान्स्वा वालेन्ते्न या डच अधिकाऱ्याच्या 1726 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथातील शिवाजी महाराजांच्या चित्रावर बेतलेले होते.
2 / 13
1672 च्या आसपास निकोलस मनुची याने भारतातील 56 राजे, बादशहांची चित्रे मिर मोहम्मद याच्याकडून तयार केली. त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिसच्या संग्रहालयात आहे. पुरंदर तहाच्या वेळी मनूची आणि शिवरायांची भेट झाल्याची नोंद आहे.
3 / 13
किशनगडचे महाराज सावंतसिंग यांच्या दरबारातील चित्रकार निहालचंद यांनी हे चित्र काढल्याचा अंदाज आहे. चित्रात महाराजांनी एका हातात दख्खनी धोप तलवार तर दूसऱ्या हातात पट्टा घेतलेला आहे. हे चित्र लंडन येथील बॉनहॅन्स कलेक्शन येथे आहे.
4 / 13
छत्रपती शिवरायांचे हे चित्र सध्या बंडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. राजपूत मुघल शैलीतील हे चित्र असल्याचे अभ्यासक सांगतात. 18 व्या शतकात हे चित्र काढण्यात आले. यामध्ये महाराजांच्या एका हातात फुल तर दूसऱ्या हातात पट्टा आहे.
5 / 13
रॉबर्ट आर्म यांच्या ‘historical fragments’ ह्या पुस्तकात शिवरायांचे हे चित्र छापण्यात आले होते. 1782 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले. यावरून हे चित्र 1782 च्या आधी काढले असावे असे संशोधक सांगतात.
6 / 13
हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शनमधील आहे. 1657 मध्ये गोवळकोंडा येथे काढले असावे. सध्या हे चित्र मुंबईतील छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात आहे. प्रवेशद्वारावर या चित्राची मोठ्ठी प्रतिकृती लावण्यात आली आहे. वास्तविक मुळ चित्र आकाराने लहान आहे.
7 / 13
हे चित्र 1885 सालचे आहे. गोवळकोंडा येथील हे चित्र आहे. सध्या ते फ्रान्समध्ये आहे.
8 / 13
छत्रपती शिवरायांचे उभे असलेले हातात तलवार, दुसऱ्या हातात पट्टा असेलेले हे चित्र फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७ व्या शतकाच्या शेवटचे असावे.
9 / 13
डाव्या हातात पट्टा उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंडमधील असून चित्र 1680 च्या आसपास असल्याची तिथे नोंद आहे. या चित्रावर Siesvage असे लिहिले आहे.
10 / 13
बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे. या चित्रावर 'siuwagie gewerzere maratise vorst असे लिहिले आहे. याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 पूर्वीचे आहे. तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे गेले.
11 / 13
पॅरीस फ्रान्स येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिष्ट म्हणजे यात महाराजांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.
12 / 13
लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराज यांचे चित्र पोटरेटेस ऑफ इंडिया प्रिंसेस या अल्बममधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनविले असून काळ 1680 ते 1867 असा नोंदवला आहे.
13 / 13
इंडियन मिनिएचर्स या चित्र संग्रहालयात प्रसिद्ध झालेले हे चित्र बर्लिनमधील चित्राशी मिळतेजुळते आहे. हे चित्र सध्या रशियन लायब्ररीत आहे.