शिंदे-फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत; देवेंद्र फडणवीस यांनी केली ही महत्त्वाची घोषणा

| Updated on: Feb 12, 2023 | 3:54 PM

बंजारा हा प्राचीन समाज आहे. जुन्या संस्कृतीतही बंजारा समाजाचा अंश आहे. लकीरशहा बंजारा यांच्या तांड्यात तीन लाख सैनिक होते. ५० लाख जनावरं होते.

शिंदे-फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत; देवेंद्र फडणवीस यांनी केली ही महत्त्वाची घोषणा
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Follow us on

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत पोहचले. संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. तसेचं शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते सेवा ध्वजाचं अनावरण करण्यात आले. वाशिम येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी केली. बंजारा भाषेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी फडणवीस म्हणाले, बंजारा समाजासाठी पैशाची कमतरता कमी पडू देणार नाही. शिंदे यांनी मला तिजोरी दिली. त्यांनी सांगितलं, ही तिजोरी बंजारा समाजासाठी उघडून टाका. १३७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. आता काम थांबू देणार नाही. बंजारा भवन, आजूबाजूच्या परिसराचा विकास केला जाईल.

सेवालाल महाराज यांनी लढायला शिकवलं

जागा दिली आहे. तुम्हाला काही पडू देणार नाही. बंजारा, धनगर समाज हे भाऊ-भाऊ आहेत. वाडवडिलांनी दिलेली जागा कायम ठेवा. आपल्या सगळ्यांना सेवालाल महाराज यांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. सेवालाल महाराज यांनी आपल्याला लढायला शिकविलं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सेवालाल महाराज यांच्या प्रतिज्ञा

नैसर्गित जीवन जगा. खोटं बोलू नका. प्रामाणिक राहा. सन्मानानं आयुष्य जगा, गरजूंना मदत करा. निर्भयपणे जगा, अशा २२ प्रतिज्ञा सेवालाल महाराज यांनी दिल्या. वसुधैव कुटुंबकम ही सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञांपैकी एक आहे. या २२ प्रतिज्ञांवर चालल्यास जगाचं भलं होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

कोण होते लकीरशहा बंजारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंजारा हा प्राचीन समाज आहे. जुन्या संस्कृतीतही बंजारा समजाचा अंश आहे. लकीरशहा बंजारा यांच्या तांड्यात तीन लाख सैनिक होते. ५० लाख जनावरं होते. लाल किल्ल्याची निर्मिती लकीरशहा बंजारा यांनी केली होती. ते समजासाठी मोठे प्रेरणास्थान होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वाजवला नगारा

नरागा हा भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचं प्रतिक आहे. हा नगारा ठेवला होता. हा नगारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी वाजविला. हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते.

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणार

संजय राठोड यांनी तयार केलेल्या तांड्याच्या विकासाच्या आराखड्याचं काम निश्चित सरकार हातात घेईल. तांड्यापर्यंत विकास पोहचवून दाखवू. ओबीसी, भटका विमुक्त, बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वंचित ठेवले जाणार नाही, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.