नाशिक : नाशिक मनमाड ते येवला महामार्गावर ( Highway ) बेधुंद होऊन एका कंटेनर चालकाने कंटेनर चालवत अनेक वाहनांना धडक ( Accident ) दिली आहे. यामध्ये अनेक वाहनांची नुकसान झाले आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. त्यामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विखरणी येथील तो तरुण आहे. रोशन मच्छिंद्र वाघमोडे असं अपघातात मृत्यू ( Nashik Death ) झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोशन हा आपल्या आईसह इतर महिलांना घेऊन बहिणीच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी जात असतांना हा अपघात घडला आहे.
कंटेनरने धडक दिल्यानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की यामध्ये रोशनचा जागेवरच मृत्यू झाला होता. दुर्दैवी बाब म्हणजे जन्म देणाऱ्या आईच्या डोळ्या देखतच रोशनने प्राण सोडले.
कोपरगावच्या दिशेने मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान अनेक वाहनांना उडविले आहे. त्यामध्ये विंचुर चौफुलीवर त्यांना चार ते पाच वाहनांना धडक दिली होती. नागरिकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतांना त्याने तिथून पळ काढला होता.
या अपघातात किती जखमी किंवा मृतांची संख्या किती आहे. नुकसान किती झाले आहे हे समोर आले नसले तरी एका तरुणाचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जात आहे. रोशन वाघमोडेच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.
अवघ्या काही दिवसांवर बहिणीचा विवाह येवून ठेपल्याने खरेदीची लगबग सुरू होती. आपल्या आईसह महिलांना घेऊन रोशन वाघमोडे हा येवला येथे खरेदीसाठी गेला होता. त्याच दरम्यान अपघात घडला आहे.
कंटेनर चालक पळून जात असतांना कंटेनर पलटी झाल्यानंतर चालक पोलीसांच्या हाती लागला आहे. येवला येथून पळून जाणारा कंटेनर अंकाई येथे पोलीसांच्या हाटी लागला आहे. इथे त्याचा कंटेनर उलटला होता.
मृत्यू झालेला रोशन मच्छिंद्र वाघमोडे हा अवघ्या 19 वर्षांचा होता. बहिणीच्या लग्नाच्या तयारीतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आईच्या डोळ्यासमोरच मुलाने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोशनची एक्झिट ही मनाला चटका लावनारी असल्याने संपूर्ण गावाच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावात स्मशान शांतता पसरली आहे.
रोशन कार चालवत असतांना त्याच्या बाजूच्या सीटवरच आई बसलेली होती. मागील सीटवर घराशेजारील काही महिला आणि नातेवाईक महिला होत्या. लग्न जवळ आल्याने घरात लगबगीचे वातावरण होते. अशातच दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.