नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात बिबट्याचा ( Leopard ) वावर कायम असल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ऊसाची शेती ( sugarcane ) असल्याने बिबट मादी बछडयांना सुद्धा शेतात जन्म देत आहे. जंगल परिसर असल्यासारखी शेती असल्याने बिबट्यांचा मुक्काम नाशिक जिल्ह्यात दिसून येत आहे. नुकताच एक व्हिडिओ वनविभागाच्या वतिने प्रसारित करण्यात आला आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. यामध्ये जन्मला आलेल्या बछडयाची आणि बिबट मादीची भेट घडवून आणली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये बिबट मादी आपल्या बछडयांना जन्मदेण्यासाठी ऊसाच्या शेतीलाच प्राध्यान्य देत असल्याचे समोर आले आहे.
नुकतेच सिन्नर येथे एका ऊसाची ऊसतोड सुरू असतांना ऊसतोड कामगारांना ऊसाची दोन बिबट्याचे नवजात बछडे आढळून आले होते. मंगळवारी हा संपूर्ण प्रकार समोर आला होता. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ गावतील ही घटना आहे.
ताटातुट झालेल्या मादीची आणि बछडयाची अशी भेट घडवून आणली जाते. #Leopard #Nashik #ViralVideo. pic.twitter.com/XY7ccJn7Sp
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 16, 2023
त्यानंतर ही बाब शेतकरी प्रदीप आढाव यांनी वनविभागाला ही माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ऊसतोड थांबवून तिथून बाजूला असा सल्ला दिला होता. त्यानंतर स्वतः वनविभागाचे पथक दाखल झाले होते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत बिबट मादी आणि बछडे यांची ताटातुट झाली आहे. ऊसतोड सुरू असल्याने बिबट मादी येथे येणं अशक्य आहे. त्यासाठी ऑपरेशन राबविण्यात आले.
त्याच दिवशी सायंकाळी ऑपरेशन राबविण्यात आले. समोरील बाजूला कॅमेरा सुद्धा लावण्यात आला. त्यामध्ये दोन पैकी एक बछडे बिबट मादी घेऊन गेली. त्यामुळे एक बछडे तसेच राहिल्याने पुन्हा ऑपरेशन राबवावे लागले.
दुसरे बछडे घेऊन जाण्यासाठी तब्बल तीस तास उशीर केला. त्यासाठी 30 तास ऑपरेशन कायम होते. दिवसभर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते एक बछडे सांभाळले. आणि त्यानंतर दुसऱ्या बछडयाची भेट घडवून आणली.
नाशिक जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी पंकज गर्ग, अनिल पवार, मनीषा जाधव यांच्या सुचनेवरुन ही ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये काही विशेष बाबी असतात त्याची काळजी घेण्यात आल्याने ऑपरेशन यशस्वी झाले.
ज्या ठिकाणी बछडे आढळून आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य करण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला ऊसाच्या चिपाडामध्ये त्यांना सहारा देण्यात आला. त्यांना ठेवण्यासाठी क्रेट वापरही करण्यात आला.
बछडयांच्या शोधात असलेल्या मादीने सुरुवातीला एकच बछडे घेऊन गेल्यानं वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर तब्बल 30 तास उलटल्यावर दुसरी मादी आली आणि बछडयांना घेऊन गेली.
रात्रभर आणि दिवसभर वनविभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून हे ऑपरेशन राबवत होते. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या बछद्याला घेऊन जाण्याचा कालावधी बघता वनविभागाला मोठी कसरत करावी लागली.