Mukhyamantri Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चे लाटलेले 9 हजार रुपये लाडक्या भावांनी केले परत !

| Updated on: Oct 04, 2024 | 11:05 AM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा होत असून महायुती सरकार या योजनेद्वारे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र लाडक्या योजनेत अनेक गैरप्रकारही घडले असून पैसे लाटण्यासाठी अनेकांनी लबाडी केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. अकोल्याचही असाचा गैरप्रकार घडला होता, जेथे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 6 पुरुषांनीच अर्ज भरला होता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणचे लाटलेले 9 हजार रुपये लाडक्या भावांनी केले परत !
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Follow us on

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला मतदारांना डोळ्यांसमोर ठेऊन राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. मात्र या योजनांमध्ये अनेक गैरप्रकारही घडले असून पैसे लाटण्यासाठी अनेकांनी फसवणुकीचे प्रकार घडले होते. काही दिवसांपूर्वी अकोल्यातही अशीच फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 6 पुरुषांनीच अर्ज भरल्याचे प्रकार उघड झाला आणि एकच खळबळ माजली.

अकोला जिल्हातील रहिवासी असलेल्या या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती आणि खोट्या स्वरूपाची भरल्याचे आढळले होते. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर या सहाही जणांना नोटीस बजावत खुलासा मागवण्यात आला होता.

दोघांनी पैसे केले परत

हे सुद्धा वाचा

आता याप्रकरणी मोठी अडपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्या सहा जणांपैकी दोन पुरूषांनी पैसे परत केले आहेत. तर हा प्रकार चुकून झाल्याचा खुलासा इतर चौघांनी केलाय.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात चक्क सहा पुरुषांनी अर्ज भरले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर, त्यापैकी दोघांनी तीन महिन्यांचे लाटलेले प्रत्येकी 4500 रुपयेप्रमाणे 9 हजार रुपये, 1 ऑक्टोबर रोजी चेकद्वारे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे परत केले आहेत. तर उर्वरित चौघांनी ‘लाडका भाऊ’ म्हणून चुकीने अर्ज भरल्याचा खुलासा सादर केला आहे.

नागपूरात 60 हजार लाडक्या बहिणींचं आधार लिंक नाही

नागपूर जिल्ह्यात अद्याप 60 हजार लाडक्या बहीणींनी आधार कार्ड हे बँक अकाऊंटशी लिंक केलं नाही, त्यामुळे पुढील तीन चार दिवसांत येणारे योजनेचे पैसे या महिलांना मिळणार नाही. पुढील तीन दिवसांत उर्वरित 60 हजार लाडक्या बहीणींनी आधार कार्ड लिंक करावं, यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनानं आजपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. प्रशासनातील कर्मचारी 60 हजार लाडक्या बहीणींना फोन करूनआधार लिंक करण्यास सांगत आहेत. अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर यांनी दिली आहे. त्यासोबत नागपूरातील महिलांसाठी दोन हजार पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीआहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील 10 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.