भजन आटोपून घरी परत येत होते, अन् … क्षणभरात काळ धावून आला ! त्या दोघांचं काय झालं ?

| Updated on: Sep 27, 2023 | 11:24 AM

भज आटोपून घराच्या दिशेने निघालेले तरूण घरी पोहोचू शकलेच नाहीत. वाटेतच काळाने त्यांना गाठले. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबिय शोकाकुल झाले असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भजन आटोपून घरी परत येत होते, अन् ... क्षणभरात काळ धावून आला ! त्या दोघांचं काय झालं ?
Follow us on

महेश सावंत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,सिंधुदुर्ग | 27 सप्टेंबर 2023 : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यानिमित्त अनेक ठिकाणी भजन आयोजित करण्यात येते. असेच एक भजन आटपून घरी परत जाणाऱ्या तरूणांवर काळाने घाला घातला आहे. घराकडे निघालेल्या दोन युवकांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू ( 2 youngt man death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्रीही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पंदारे(वय २५) आणि राहुल पंदारे( वय २१) असे मृत्यूमुखी पडलेल्या दोन युवकांचे नाव आहे. ते आंजिवडे येथील रहिवासी आहेत. अथक दीड तास प्रयत्न केल्यानंतर झाडाखाली अडकलेला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गाव हादरलं असून त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं ?

सावंतवाडीच्या राजवाडा परिसरात मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. संभाजी पंदारे आणि राहुल पंदारे हे दोन्ही युवक कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंजीवडे गावचे रहिवासी आहेत. भजनासाठी ते सावंतवाडी येथे आले होते. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते घरी परत जात असतानाच अचानक त्यांच्या अंगावर झाडं कोसळलं. माडासह विजेच्या तारा अंगावर कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यांना वाचवणं शक्य नाही झालं नाही. रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यांची वेळच काळ बनून आल्याचे सांगत उपस्थितांनी दु:ख व्यक्त केले.

मात्र त्यांच्यापैकी एका तरूणाचा मृतदेह हा माडाच्या झाडाखाली अडकला होता. तो काढण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू होते. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर कटरच्या सहाय्यानं माडाचे दोन भाग करण्यात आले. त्यानंतरच त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. या घटनेची माहिती पंदारे कुटुंबियांना देण्यात आली. देवाच्या सेवेसाठी, भजन करण्यासाठी गेलेल्या घरातील दोन कर्त्या युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी बातमीमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.