अंधेरीतील रिया पॅलेस इमारतीत भीषण आग, तिघांचा मृत्यू ; अखेर आग विझवण्यात यश

| Updated on: Oct 16, 2024 | 10:42 AM

मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस या इमारतीमधील 10 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला

अंधेरीतील रिया पॅलेस इमारतीत भीषण आग, तिघांचा मृत्यू ; अखेर आग विझवण्यात यश
अंधेरीतील इमारतीला आग, तिघांचा मृत्यू
Follow us on

मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस या इमारतीमधील 10 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. आगीची वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर बऱ्याच वेळानंतर आग विझवण्याचत फायर ब्रिगेडच्या जवानांना यश मिळाले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्स , क्रॉस रोड नंबर 4 जवळ रिया पॅलेस नावाची 14 मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील एका रहिवासी फ्लॅटला सकाळी 8 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. साधारण 9 च्या सुमारा अथक प्रयत्नांती आग विझवण्यात आली. मात्र त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. चंद्रप्रकाश सोनी (वय 74), कांता सोनी ( वय 74) आणि पेलूबेटा ( वय 42) असे मृतांचे नाव आहे अशी माहिती मिळते.

माहीममध्येही लागली होती आग

काही दिवसांपूर्वी मुंबईतील माहीम परिसरातील एका रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग लागली होती. मोहित हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली.मात्र सुदैवाने कोणीतही जीवितहानी झाली नाही. ही आग एवढी भीषण होती की घरातील सर्व सामानही जळून खाक झालं . इमारतीमध्ये काही रहिवासी अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवण्यात आली. या आगीत घराचं, सामानाचं बरंच नुकसान झालं तसेच सून आगीमुळे अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या .