Buldhana Bus Accident : त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी

| Updated on: Jul 01, 2023 | 2:02 PM

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Buldhana Bus Accident :  त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी
Buldhana Bus Accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : बुलढाण्यात मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला अपघात होऊन ती पेटल्याने 25 जणांचा जागीच होरपळून मृ्त्यू झाला.  या बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे आधी म्हटले जात होते. परंतू प्राथमिक तपासात टायर फुटून अपघात झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. या बसवर  नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणात दंडात्मक कारवाई झाल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान या अपघातातील बळींची नावे जाहीर करण्यात आली आहे. बस अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करीत घटनास्थळ गाठले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच असून शुक्रवारी रात्री येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला अपघात होऊन तिची इंधन टाकी फुटून लागलेल्या आगीत बसमधील 25 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील बळींचे देह ओळखण्यापलिकडे गेले असल्याने त्यांची डीएनए चाचणी करुन ओळख पटविली जाणार आहे. दरम्यान या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या MH 29 BE – 1819 ही खाजगी ट्रॅव्हल्सची बसला अपघात होऊन तिला अचानक आग लागून अपघाताची हानी वाढली आहे.

बसवर दंडात्मक कारवाई 

या अपघात ग्रस्त बसचे पीयूसी वैध नव्हते असे समजते. गाडीत अग्निशामक यंत्रे नव्हती. काचा फोडण्यासाठीचे हॅमर नव्हते. काचाबंद बसेसमध्ये आपत्कालिन परिस्थिती बाहेर पडण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे तसेच क्लीनर आणि ड्रायव्हरना आपात्कालिन परिस्थिती हाताळण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसल्याचे समजते. या बसला आतापर्यंत 11,200 आणि 4,500 असा दंड प्रलंबित होता असे सांगण्यात येते.

कोणतीही सुविधा नाही

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले आहे. या मार्गावर जेवण आणि अल्पोहाराची कोणतीही सुविधा नाही, चालकांना घडीवर विसावा घेण्याचे ठीकाण नाही. तसेच एम्ब्युलन्स आणि रुग्णालयाची सुविधा नसल्याचे उघडकीस आले आहे.

या अपघातग्रस्तांची नावे खालील प्रमाणे –

1 ) अवंती पोहनीकर ( वर्धा )

2 ) संजीवनी शंकरराव गोटे – ( हिंगणघाट )

3 ) प्रथमेश खोडे –  ( वर्धा )

4 ) श्रेया वंजारी –  ( वर्धा )

5 ) राधिका खडसे –  ( वर्धा )

6 ) तेजस पोकळे –  ( वर्धा )

7 ) तनिशा तायडे –   ( वर्धा )

8 ) शोभा वनकर –  ( वर्धा )

9 ) वृषाली वनकर –  ( वर्धा )

10 ) ओवी वनकर –  ( वर्धा )

11 ) करण बुधबावरे – ( सेलू )

12 ) राजेश्री गांडोळे – ( आर्वी )