10 महिन्यांत 451 बालकांचा झाला मृत्यू, रुग्णालयात प्रसूती होऊनही माता व बालमृत्यू थांबेना

| Updated on: Feb 20, 2023 | 9:30 AM

राज्याचा अर्भक मृत्युदर हा दर हजारी 19 टक्के आहे. यात गोंदियाची परिस्थिती पाहता गोंदियाचा अर्भक मृत्युदर हा 14.44 टक्के आहे.

10 महिन्यांत 451 बालकांचा झाला मृत्यू, रुग्णालयात प्रसूती होऊनही माता व बालमृत्यू थांबेना
gondia
Image Credit source: tv9marathi
Follow us on

शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात (Gondia) एकीकडे रुग्णालयांमधील (hospital) प्रसूतीचे प्रमाण 99.97 वर नेण्यात आरोग्य विभागाला (health department) यश आले असले, तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात अपयश आले आले आहे. कुपोषणासह इतर कारणांनी गोंदिया जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मागील 10 महिन्यांत 206 अर्भक तर 4 वर्षांतील 245 अशा 451 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टर आणि तज्ज्ञ यावर विचार करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूचे तांडव सुरु असल्याचे प्रशासनाची सुध्दा डोकेदुखी वाढली आहे.

99.97 टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतचं

गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन 2022 च्या एप्रिल ते जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात 14 हजार 320 महिलांची प्रसूती झाली. यातील 14 हजार 316 महिलांची म्हणजेच 99.97 टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली. केवळ 4 महिलांची प्रसूती घरी झाल्याची माहिती मिळाली आहे.

महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह

एकूण प्रसूतींपैकी 4 हजार 84 उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 9 हजार 850 प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे 317 प्रसूती करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

महिलांची घरी प्रसूती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान

गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. विशेष म्हणजे त्यासाठी जनजागृतीही करण्यात आली होती. त्यामुळे महिलांची घरी प्रसूती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

1 वर्ष या वयोगटातील 206 अर्भक दगावली

आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. मागील दहा महिन्यांत शून्य ते 1 वर्ष या वयोगटातील 206 अर्भक दगावली आहेत. शून्य ते 5 वर्षे वयोगटातील 245 बालकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक प्रसूती ही आरोग्य संस्थेत होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.

राज्याचा अर्भक मृत्युदर हा दर हजारी 19 टक्के आहे. यात गोंदियाची परिस्थिती पाहता गोंदियाचा अर्भक मृत्युदर हा 14.44 टक्के आहे.