रामकुंडावरील रावण दहनाची 60 फूटी उंचीचा रावण दहनाची परंपरा तुम्हाला माहितीय का?

| Updated on: Oct 05, 2022 | 6:43 PM

नाशिकमधील तत्कालीन महंत बंधूदास महाराजांनी या रावण दहणाला सुरुवात केली होती. 1967 मध्ये ही सुरुवात करण्यात आली होती.

रामकुंडावरील रावण दहनाची 60 फूटी उंचीचा रावण दहनाची परंपरा तुम्हाला माहितीय का?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नवरात्र उत्सव (Navratri Festival) साजरा करत असतांना दसऱ्याच्या दिवशी रावन दहन करण्याची परंपरा आहे. प्रत्येक शहराची रावण दहन (Ravan Dahan) करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे ती परंपरा जपण्याचे काम तेथील नागरिक करीत आहेत. नाशिकच्या रामकुंडावर (Nashik Ramkund) देखील खास परंपरा असून दोन दिवस त्याची तयारी सुरू असते. तब्बल 60 फुट रावण दहन करण्यात येते. त्याची लगबग नाशिकच्या रामकुंडावर मोठ्या प्रमाणात सुरू असते. चतु:संप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिर विश्वस्त यांच्याकडून 55 वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. नवरात्र उत्सवात दसऱ्याच्या दिवशी नाशिककरांसाठी हा आकर्षणाचा विषय ठरत असतो. याशिवाय अबाल-वृद्ध यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यातच तब्बल दोन वर्षांनी हा रावन दहण होणार असल्याने मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

नाशिकमधील तत्कालीन महंत बंधूदास महाराजांनी या रावण दहणाला सुरुवात केली होती. 1967 मध्ये ही सुरुवात करण्यात आली होती.

नाशिकच्या रामकुंडावर रावण दहनाची ही परंपरा नंतरच्या काळात महंत कृष्णचरण दास यांनी सुरू ठेवली आहे.

नाशिकच्या रामकुंडावर बालाजी मंदिर आहे. त्यामंदिराच्या समोरच्या प्रांगणात रावण दहन केले जाते. 60 फुट उंचीचा हा रावण दहन असतो.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे रावण दहन खंडित झाले होते. मात्र आता पुन्हा रावण दहनाची सुरुवात झाली असून यंदाच्या वर्षी मोठा उत्साह दिसून येत आहे.

बालाजी मंदिरात नवरात्र उत्सवात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या धुमधडक्यात साजरा होत असून सामुदायिक पारायण यावेळी पार पडले आहे.

याच दरम्यान पंचवटी परिसरात वानर सेनेसह राम-लक्ष्मण, बिबिशनसह रावनाची वेशभूषा करत मिरवणूक काढण्यात आली आहे.

नाशिक शहरातील साधू-महंत आणि नाशिक शहरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थित रावण दहन केले जाते. यंदाच्या वर्षी हे रावण दहन पाहण्यासाठी मोठी गर्दी राहणार आहे.