नाशिक : नाशिकमधील एका आज्जीबाईने (Grand Mother) केलेली कामगिरी आश्चर्य वाटण्याजोगी आहे. साठी ओलांडल्यानंतर खरंतर आयुष्याचे उर्वरित वर्षे हे नातनांध्ये खेळण्या-बागडण्यात अनेक जण घालवतात. शांततेत आणि आनंदात आयुष्य कसं जाईल याच्यावर लक्ष केंद्रित करत असतात. मात्र, नाशिकची (Nashik) एक आज्जी याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत आहे. 77 वर्षीय आज्जी तरूण पिढीला तोंडात बोट घालायला लावेल अशी कामगिरी केली आहे. या आजीला पाहून मराठी चित्रपटात पोहणाऱ्या (Swimming) आर्चीची आठवण अनेकांना आल्याशिवाय राहत नाही. 77 वर्षीय आजीचा उत्साह हा विलक्षण आहे. आजी आजही दररोज पोहण्याचा सराव करत असते. आज्जीने राज्यस्तरीय स्पर्धेत 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर मेडल मिळवले आहे. नाशिकच्या जलतरण तलावात दररोजचा सराव सुरू असून हरी सोनकांबळे हे आजीचे कोच आहेत.
स्विमर आजीचे नाव जयंती काळे असे आहे. आजी 77 वर्षाच्या असून आजीचे वडील हे सरकारी सेवेत होते. आजीला एकच मुलगी आहे.
मनात काही करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर त्याला वयाचा अडथळा येत नाही, असं या नाशिकच्या 77 वर्षीय जयंती काळे या आजीने पटवून दिले आहे.
जयंती काळे यांना स्विमिंग पूलाबरोबरच नदीत आणि विहिरीत पोहण्याचा छंद आहे, त्यात त्यांचा आणि त्याच्या सासूचा एक गमतीशीर किस्सा देखील आहे.
जयंती यांच्या सासुबाईनी त्यांना शेती बघायला नेले होते, त्यावेळी विहीर दिसताच जयंती यांनी विहीरीत उडी मारली होती, सुनेने उडी मारून सासूबाई घाबरल्या होत्या.
सुनेला मी ढकलले असा अर्थ होईल म्हणून सासू बाई जोरजोरात ओरडू लागल्या होत्या, मात्र जयंती या लागलीच पाण्यावर तरंगतांना म्हणाल्या घाबरू नका मला पोहता येते सासूने सुटेकचा निश्वास सोडला.
जयंत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांचा त्यासाठीचा सराव देखील सुरू असून आज्जीच्या स्विमिंगचे कौतुक देखील होत आहे.