गेल्या पाच वर्षात मुंबईतील बेस्ट बसेसच्या ८३४ अपघात ८८ जणांचा मृत्यू

| Updated on: Jan 13, 2025 | 4:21 PM

ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे घ्यावी असेच दर्शवते. या आकडेवारीने बेस्ट प्रशासनाने आणि कर्मचाऱ्यांनी वाहन चालविताना प्रवाशांची अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या पाच वर्षात मुंबईतील बेस्ट बसेसच्या ८३४ अपघात ८८ जणांचा मृत्यू
Follow us on

अलिकडे कुर्ला येथे बेस्ट अनियंत्रित झालेल्या अपघातात आठ जण ठार तर ४० जण जखमी झाल्याची घटना घडली होती. गेल्या पाचवर्षात बेस्ट ८३४ अपघात झाले असून त्यात ८८ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी बेस्ट दिली आहेय या प्रकरणात बेस्ट प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

बेस्ट प्रशासनाकडे गेल्या पाच वर्षात घडलेल्या बेस्टच्या अपघातांची , जीवितहानी आणि आर्थिक नुकसान भरपाईची माहिती मागितली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी गेल्या पाच वर्षांची सविस्तर माहिती दिली आहे, त्यानुसार गेल्याय ५ वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचा यांचा समावेश आहे. बेस्टचे ३५२ अपघात घडले असून यात जीवितहानीची संख्या ५१ आहे तर खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे ४८२ अपघातात होऊन त्यात ३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्ष २०२२-२३आणि वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

बेस्टच्या चुकीने झालेल्या अपघातात गेल्या पाच वर्षात मृतांच्या वारसांना आणि जखमींना ४९४ प्रकरणात बेस्टने ४२.४० कोटींची आर्थिक नुकसान भरपाई दिलेली आहे. या सर्वात जास्त रक्कम साल २०२२-२३ मध्ये सर्वाधिक १०७ प्रकरणात सर्वाधिक १२.४० कोटीची आर्थिक नुकसान दिली आहे. साल २०१९-२० मध्ये ९.५५ कोटी, साल २०२०-२१ मध्ये ३.४४ कोटी आणि साल २०२१-२२ मध्ये ९.४५ कोटी, साल २०२३-२४ मध्ये ७.५४ कोटी आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

१२ कर्मचारी बडतर्फ, २४ कर्मचारी निलंबित

गेल्या पाच वर्षात प्राणांकीत अपघातात १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून जखमी झाल्याचा प्रकारात २ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर वैयक्तिक इजा प्रकरणात २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून काही जणांना ताकीद ,समज, दंड वसुली, श्रेणीत कपात अशा प्रकारच्या कारवाई करण्यात आली आहेत.