लातूर : 95 वे अखिल भारतीय (Sahitya Samelan) साहित्य संमेलन जिल्ह्यातील (Udgir) उदगीर नगरीत होणार आहे. त्याअनुशंगाने उदगीर शहरात तयारी सुरु झाली असून या तीन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. त्याअनुशांने स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आणि दरम्यानच्या काळात मान्यवरांची उपस्थिती याअनुशंगाने लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. (Latur) लातूर हे एक शांतताप्रिय जिल्हा असून अशा साहित्यिक कार्यक्रमामध्ये राजकीय मतभेद बाजूला सारुन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते समोर येणार आहेत. याची प्रचिती संमेलनाच्या अनुशंगाने पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आली आहे. यावेळी भाजपाचे आमदार,खासदार, काँग्रेसचे महापौर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये हे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. 22 एप्रिल रोजी उद्घाटन होणार असून तीन दिवसीय संमेलन असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन हे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. तर तर समारोपाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे उपस्थित आसनार आहेत. या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच पर्यावरणावर परिसंवाद आयोजित केला गेला आहे. उदयगिरी महाविद्यालयत 22, 23 आणि 24 एप्रिल दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर हे संमलेन होत असल्याने अनेकांची उपस्थिती लाभणार आहे. देशभरातील 1 हजार पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कवी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उदगीर, लातूर, बिदर आणि नांदेड येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातला उन्हाळा आणि अवकाळी पावसाचा शक्यता लक्षात घेउन मंडप व्यवस्था करण्यात आली आहे . जवळपास 36 एकर परिसरात मंडप व्यवस्था उभी करण्यात येत आहे. मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुशंगाने लातूर येथे पत्रकार परिषद पार पडली असून या परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती. शिक्षणात लातूर पॅटर्नची वेगळी ओळख आहेच पण शांतताप्रिय जिल्हा म्हणूनही लातूरकडे पाहिले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर नगरीत होत असून ते यशस्वीपणे पार पाडणे ही प्रत्येक लातूरकराची जबाबदारी आहे. म्हणूनच पत्रकार परिषदेला भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती. यावळे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी संमेलनाची रुपरेषा सांगितली.
Tourist places : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या!
Face Check | व्यवहारापूर्वी एटीएमवर दोनदा Cancel बटण दाबा, पिन चोरीचे टेन्शन नाही, दावा खरा?